भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे पुराव्यानिशी सचिन सावंतांच्या टीकेला प्रत्युत्तर
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीत म्हणजे एफडीआयमध्ये महाराष्ट्र पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३च्या अखेरच्या तिमाहीत महाराष्ट्राने सर्व राज्यांना मागे टाकत परकीय गुंतवणुकीत पहिला क्रमांक पटकवला आहे. महाराष्ट्राच्या खालोखाल अनुक्रमे कर्नाटक आणि गुजरातचे स्थान आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. दरम्यान या अगोदर महाविकास आघाडी सरकारच्या काळात परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र क्रमांक एक वर नव्हता, मात्र काँग्रेस नेते सचिन सावंतांनी महाराष्ट्र एक वर असल्याचा दावा केला होता आणि मोदी सरकारवरही टीका केली होती. यावर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी प्रत्युत्तर दिलं आहे. No one can hold Sachin Sawants hand in lying even if he is slapped in the face every time Keshav Upadhye
केशव उपाध्ये म्हणतात, ‘’दरवेळी तोंडावर आपटूनही खोटे बोलण्यात माझे मित्र सचिन सावंत यांचा हात कुणीही धरु शकत नाही.सप्टेंबर 2020 आणि मार्च 2021 या दोन्ही काळातील डीआयपीपी अहवालाचे फोटो सोबत जोडत आहेत. कोण पहिल्या क्रमांकावर होते, ते पहा आणि आता खरोखरच महाराष्ट्र क्रमांक 1 वर आला, हे मान्य करुन टाका. कशाला वारंवार फजिती करुन घेता राव?’’
दरवेळी तोंडावर आपटूनही खोटे बोलण्यात माझे मित्र सचिन सावंत यांचा हात कुणीही धरु शकत नाही.सप्टेंबर 2020 आणि मार्च 2021 या दोन्ही काळातील डीआयपीपी अहवालाचे फोटो सोबत जोडत आहेत. कोण पहिल्या क्रमांकावर होते, ते पहा आणि आता खरोखरच महाराष्ट्र क्रमांक 1 वर आला, हे मान्य करुन टाका.… https://t.co/6PzqTqQaps pic.twitter.com/tsB8eJhlGj — Keshav Upadhye (Modi Ka Pariwar) (@keshavupadhye) June 8, 2023
दरवेळी तोंडावर आपटूनही खोटे बोलण्यात माझे मित्र सचिन सावंत यांचा हात कुणीही धरु शकत नाही.सप्टेंबर 2020 आणि मार्च 2021 या दोन्ही काळातील डीआयपीपी अहवालाचे फोटो सोबत जोडत आहेत. कोण पहिल्या क्रमांकावर होते, ते पहा आणि आता खरोखरच महाराष्ट्र क्रमांक 1 वर आला, हे मान्य करुन टाका.… https://t.co/6PzqTqQaps pic.twitter.com/tsB8eJhlGj
— Keshav Upadhye (Modi Ka Pariwar) (@keshavupadhye) June 8, 2023
काय म्हणाले होते सचिन सावंत? –
‘’गुजरातला मोदी सरकारने महाराष्ट्रापुढे नेण्याचा प्रयत्न करुनही मविआ सरकारच्या काळात जून महिन्यात अनैतिक पध्दतीने सरकार पाडेपर्यंत महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावरच होता. महाराष्ट्र मागे गेला असे केवळ फडणवीसांना वाटत होते. परंतु गुजरातमधील FDI प्रमाण गेल्या तीन तीमाहीत १९% वरुन १६% वर घसरले. २०२१ मध्ये एका तिमाहीत केंद्र सरकारच्या वरदहस्तामुळे हार्डवेअरमधील प्रचंड गुंतवणूक गुजरातला मिळाली पण नंतर प्रगती शून्य. म्हणून फडणवीसांना शंका असली वा मोदी सरकारने कितीही महाराष्ट्राचे पाय ओढले तरी महाराष्ट्र नं १ चं होते, आहे आणि राहील.’’ असं सचिन सावंत म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App