पुण्यात मेट्रोच्या तिकिटासाठी आता रांगेत थांबण्याची नाही गरज; घ्या डिजिटल तिकीटे

प्रतिनिधी

पुणे : प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी महामेट्रोने गेल्या आठवड्यात पुण्यातील मेट्रो स्थानकांमध्ये १२ डिजिटल किऑस्क बसविले आहेत. यातून गुगल- पे चा वापर करूनही तिकिट खरेदी करता येईल. No need to wait in queues for Metro tickets in Pune; Get digital tickets

तिकिटांसाठी आता डिजिटल किऑस्क यंत्रणा

महामेट्रोने पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो स्थानकांवर तिकीट खरेदीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. डिजिटल किऑस्क हे स्वयंचलित यंत्र आहे. या यंत्रावरील क्यू-आर कोड करून प्रवासी तिकिट घेऊ शकतात. प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे तपशील नमूद केल्यावर त्यांची पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रवासाचे तिकिट उपलब्ध होईल.

तसेच मेट्रो प्रवासी बँकेच्या डेबिट कार्डने सुद्धा पेमेंट करून तिकीट खरेदी करू शकतील. डिजिटल किऑस्कमध्ये तिकीट घेण्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये सूचना देण्यात येतील, तुम्ही सोयीस्कर भाषा निवडू शकता. हे मशिनमध्ये तिकीट काढण्यासाठी टच स्क्रिन सुविधा आहे.

एटीएम मशिनप्रमाणे प्रवासी अगदी सहज डिजिटल किऑस्क हाताळू शकतात. पुणे मेट्रोच्या अ‍ॅपवरूनही प्रवाशांना मेट्रो प्रवासाचे तिकीट आता सहज उपलब्ध होणार आहे.

No need to wait in queues for Metro tickets in Pune; Get digital tickets

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात