विशेष प्रतिनिधी
मुंबई : अजित पवारांच्या अकाली एक्झिट मुळे जिल्हा परिषद निवडणुकांच्या वेळापत्रकात बदल होणार नाही. कारण नियमांमध्ये तशी तरतूद नाही, असा खुलासा राज्य निवडणूक आयोगाने केल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्रात बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुका सुरू आहेत. त्या निवडणुकीचा प्रचार दौरा करण्यासाठीच अजित पवार बारामतीला गेले होते. परंतु तिथे पोहोचण्यापूर्वीच विमानतळावर त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यात अजित पवार कालवश झाले.
– ठरलेल्या दिवशी मतदान आणि निकाल
परंतु अजितदादांच्या अकाली एक्झिटचा जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या वेळापत्रकात बदल होणार नाही. या दोन्ही निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होईल आणि 7 फेब्रुवारी रोजी निकाल लागतील.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर राज्य शासनाने शासकीय दुखवटा जाहीर केला. तो 30 जानेवारी रोजी संपेल. त्यामुळे निवडणुकीच्या कामात कायदेशीर पातळीवर कुठलाच प्रतिबंध असणार नाही म्हणून निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल होणार नाही.
– सहानभूतीचा फायदा शक्य
निवडणुकीच्या प्रचारात इथून पुढे अजित पवार नसल्याने प्रचाराचा एकूण नूर पालटलेला असेल. सर्वच पक्षांचे नेते निवडणूक प्रचारात फारसे उतरणार नाहीत आणि उतरले तरी आधीचा झपाटा त्यात असणार नाही. त्यामुळे ही निवडणूक एक low key political affair ठरण्याची शक्यता आहे. अर्थात अजित पवारांच्या अकाली एक्झिटच्या सहानुभूतीचा फायदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची देखील दाट शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App