Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले- राजकारणात एक्सपोर्ट-इम्पोर्ट वाढले; आयाराम-गयाराम संस्कृतीवर वार

Nitin Gadkari

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Nitin Gadkari केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या खास मुलाखतीत सध्याच्या राजकीय प्रवाहांवर स्पष्ट आणि परखड भाष्य करत आयाराम-गयाराम संस्कृतीवर अचूक निशाणा साधला आहे. सध्या भाजपमध्ये सर्वाधिक पक्षप्रवेश होत असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गटासह विविध पक्षांतील नेते भाजपमध्ये दाखल होत असतानाच, गडकरींनी या ‘प्रवेश पर्वा’कडे उपरोधिक शैलीत पाहिले. सत्ता जिथे तिथे जा आणि सत्ता बदलली की पुन्हा दुसरीकडे वळा, हे राजकारणातलं एक्सपोर्ट-इम्पोर्ट वाढलं आहे, असे म्हणत त्यांनी या प्रवृत्तीबद्दल नाराजी व्यक्त केली. भाजप ‘राष्ट्रीय प्रवेश पार्टी’ ठरत असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.Nitin Gadkari

गेल्या दोन वर्षांत इतर पक्षांच्या तुलनेत भाजपमध्ये सर्वाधिक प्रवेश झाले असल्याचे निरीक्षण गडकरींनी नोंदवले. राज्यागणिक प्रदेशाध्यक्षांमध्ये पक्षप्रवेशांची जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र असल्याचेही त्यांनी सूचित केले. मात्र, या वाढत्या प्रवेशांमागील हेतू आणि निष्ठेचा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आयाराम-गयाराम प्रवृत्तीवर थेट बोट ठेवले. सत्ताधाऱ्यांकडे झुकण्याची ही मानसिकता लोकशाहीसाठी घातक असल्याचे सूचक विधान करत, त्यांनी या प्रवाहाकडे गंभीरपणे पाहण्याची गरज असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. गडकरींच्या या वक्तव्याने भाजपसह इतर पक्षांतीलही ‘पक्षांतर’ संस्कृतीवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.Nitin Gadkari



या मुलाखतीत गडकरींनी आपली वैयक्तिक बाजू आणि नागपूरशी असलेली भावनिक नाळही उलगडली. नागपूर माझी जन्मभूमी आहे. इथल्या लोकांच्या सहवासात राहूनच मी काम शिकलो. नागपूरची जनता हा माझा परिवार आहे, असे सांगत त्यांनी शहराबद्दलचा अभिमान व्यक्त केला. आपल्या आरोग्याबाबत मिश्किल टिप्पणी करताना त्यांनी खाण्याची आवड कमी झाली नसल्याचे सांगितले, मात्र 43 किलो वजन घटल्याची माहिती दिली. दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी नाश्ता आणि जेवणाच्या वेळचे किस्से सांगताना, येणाऱ्या प्रत्येकासाठी अन्न तयार असते, अशी आठवण त्यांनी शेअर केली. दिल्लीतील मोठ्या बंगल्यात शेती केली जाते आणि त्यामुळे तिथे मोरही येतात, असे सांगत त्यांनी आपल्या साध्या जीवनशैलीचे दर्शन घडवले.

राजकारणातील सुरुवातीच्या संघर्षांची आठवण सांगताना गडकरींनी जुन्या दिवसांचा आढावा घेतला. आम्ही ज्या काळात काम केलं, तेव्हा ऑटोरिक्षातून घोषणा करत प्रचार करायचो. तेव्हा मानसन्मान नव्हता, पण काम करण्यात वेगळाच आनंद होता, असे ते म्हणाले. त्या काळात आंदोलन करताना लाठीचार्जलाही सामोरे जावे लागल्याची आठवण त्यांनी सांगितली. आजच्या राजकारणात सत्ता आणि सोयीच्या गणितावर आधारित निर्णय घेतले जात असताना, त्या जुन्या संघर्षांची आठवण करून देत गडकरींनी अप्रत्यक्षपणे सध्याच्या राजकीय वास्तवावर भाष्य केले.

नागपूर महापालिका निवडणुकीबाबत बोलताना गडकरींनी मोठा दावा केला. या निवडणुकीत आम्हाला 101 टक्के बहुमत मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागपूरमध्ये पूर्वी पाण्याची तीव्र टंचाई होती आणि नगरपालिकेच्या बैठका महाल परिसरात होत असताना मटका घेऊन जावे लागायचे, असे ते म्हणाले. त्या काळातील संघर्षांमधूनच आजचा विकास घडून आला, असे सांगत त्यांनी नागपूरच्या परिवर्तनाचा प्रवास अधोरेखित केला. त्यांच्या या दाव्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपची भूमिका अधिक आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

नागपूरच्या विकास आराखड्याबाबत बोलताना गडकरींनी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती दिली. कचऱ्यापासून सीएनजी गॅस तयार करून त्यावर स्कूटर, मोटार आणि बसेस चालवण्याचा प्रयोग सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी नागपूरची परिस्थिती अशी होती की अनेक घरांमधील तरुण मुंबई-पुण्यात नोकरीसाठी गेले होते, याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यावर उपाय म्हणून नागपूरमध्ये ‘सिंबायोसिस’सारख्या शैक्षणिक संस्थांना आणल्याचे सांगत, स्थानिक विद्यार्थ्यांना 15 टक्के सवलत दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘अॅडव्हांटेज विदर्भ’ उपक्रमातून गेल्या काही वर्षांत गुंतवणूक वाढल्याचा दावाही त्यांनी केला.

नागपूरच्या विकासाचे मोठे व्हिजन

गडचिरोलीसारखा आर्थिकदृष्ट्या मागास जिल्हा आणि आदिवासीबहुल भागात उद्योग सुरू होत असल्याचे सांगत गडकरींनी विदर्भाच्या विकासाचा व्यापक दृष्टिकोन मांडला. वर्धा रोडवर जागतिक दर्जाचा बर्ड पार्क उभारण्याची योजना असून, त्यात जगभरातील पक्षी आणले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरला आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट करत त्यांनी शहराला जागतिक नकाशावर आणण्याचा निर्धार व्यक्त केला. एकीकडे राजकारणातील ‘एक्सपोर्ट-इम्पोर्ट’वर टीका, तर दुसरीकडे नागपूरच्या विकासाचे मोठे व्हिजन मांडत गडकरींनी या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर ठसठशीत भूमिका मांडली आहे.

Nitin Gadkari Slams Politics Export Import Culture Party Entry Photos VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात