आमदार बाप ओक्साबोक्शी रडला; रहांगडाले कुटुंबियांचे नितीन गडकरी यांनी केले सांत्वन

विशेष प्रतिनिधी

भंडारा : वर्धा येथे २५ जानेवारीला झालेल्या अपघातात आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार याचा मृत्यू झाला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रहांगडाले कुटूंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. Nitin Gadkari consoles vijay Rahangdale family

वर्धा जिल्ह्याच्या सेलसुरा गावाच्या नदीत कार कोसळून ७ जण ठार झाले होते. सातही जण सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी असून यात गोंदिया जिल्ह्याचा तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले याचा देखील समावेश होता. या पार्श्वभूमीवर आमदार विजय रहांगडाले यांचे सांत्वन करण्यासाठी गडकरी यांनी त्यांच्या घरी भेट दिली.

यावेळी गडकरी म्हणाले, अपघात कसा झाला ? त्यासाठी चौकशी समिति गठीत केली आहे. आम्हाला रोड सेफ्टी बद्दल आणखी सतर्कता बाळगावी लागेल. देशात वर्ष भरात पाच लाख अपघात होतात. साडेतीन लाख लोक अपघातात मृत्यू पावतात.

तमिळनाडूने ५० टक्के अपघातावर नियंत्रण मिळविले आहे. महाराष्ट्रात अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजचे आहे. वर्धा येथील अपघाताची ही घटना खूप दुर्भाग्यपूर्ण आहे. रहांगडाले परिवारासोबत माझे घरगुती संबंध आहेत. त्यांच्या मुलांच्या आत्म्याला परमात्मा शांति देवॊ व कुटुंबियांना दुःख सहन करण्याचे बळ द्यावे, अशीच प्रार्थना करतो असे गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari consoles vijay Rahangdale family

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात