Nitesh Rane : बुरखा घालून परीक्षेला बसायला परवानगी नको, नितेश राणेंचे शिक्षण मंत्र्यांना पत्र; पण काँग्रेसचा राणेंच्या पत्राला विरोध!!

Nitesh Rane

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Nitesh Rane  दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांना कुठल्याही उमेदवाराला बुरखा घालून परीक्षेला बसायला परवानगी देऊ नका, अशा आशयाचे पत्र देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्री नितेश राणे यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना पाठविले. त्यामुळे काँग्रेसचा संताप झाला काँग्रेसने नितेश राणे यांच्या विरुद्ध भूमिका घेत त्यांचा निषेध केला.Nitesh Rane

दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार होतात. त्यामध्ये बुरखा घालून अनेक बनावट उमेदवार परीक्षा देऊ शकतात. या संदर्भात शिक्षण विभागाने काळजी घेतली पाहिजे. यातलाच एक भाग म्हणून बुरखा घातलेल्या कुठल्याही व्यक्तीला परीक्षेला बसायची परवानगी देऊ नका, असे पत्र नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना लिहिले. यासंदर्भात अजून निर्णय होणे अपेक्षित आहे.



परंतु नितेश राणे यांचे पत्र दादाजी भुसे यांच्यापर्यंत पोहोचताच काँग्रेसला राग आला. काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी राणे यांच्या भूमिकेचा निषेध केला. मुस्लिम मुली शिकताहेत. त्या पुढे येऊ इच्छितात. त्यामध्ये बुरख्यासारख्या मुद्द्याचा वापर करून कोणी खोडा घालायला नको. उलट मुस्लिम मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे हुसेन दलवाई म्हणाले.

परंतु नितेश राणे यांनी आपल्या पत्रात मुस्लिम मुलींना परीक्षेला सरसकट बसू देऊ नका असा कुठलाच उल्लेख केलेला नव्हता. त्यांनी फक्त बुरखा घातलेल्या व्यक्तीला परीक्षेला बसायची परवानगी देऊ नका, एवढाच उल्लेख केला. परंतु, तो देखील काँग्रेसला टोचला.

Nitesh Rane’s letter to Education Minister should not be allowed to appear in exams wearing burqa; But Congress opposes Rane’s letter!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात