विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nitesh Rane, राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे. अशातच, मिरा भाईंदरमध्ये भाजपचे आक्रमक नेते आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या या विधानामुळे राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.Nitesh Rane,
मिरा भाईंदर येथे बोलताना नितेश राणे म्हणाले, मिरा भाईंदरच्या आजूबाजूच्या परिसरात बघा किती हिरवे साप वळवळ करत आहेत. हिरव्या सापांना इथे दूध पाजू नका हे तुमचे कधीच होणार नाहीत. ते तुम्हाला त्यांच्या खिशातले काढून देणार नाहीत. गोलटोपी आणि हिरवे साप इकडून मोठ्या प्रमाणात मच्छी मारून घेऊन जातात त्यामुळे ड्रोन चालू केले आहेत.Nitesh Rane,
पुढे बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, तुम्ही एकदा मला पाच वर्षे द्या, मी संपूर्ण भागाचा विकास करून देईन. 2026 ला आम्ही मुख्यमंत्री मत्स्य विकास योजना सुरु करणार आहोत. त्याच बरोबर आम्ही 2026 ला 26 योजना चालू करणार आहेत. तुमचे सगळे प्रश्न आम्ही सोडवतो, मात्र मतदान त्यांना करता असे होता कामा नये. आम्ही पाहिल्यांदा 100 दिवसात मच्छीमारीला शेतीचा दर्जा दिला. जी शेतकऱ्यांना भरपाई मिळते त्याच प्रकारची भरपाई तुम्हाला देखील मिळणार आहे, असे आश्वासन राणेंनी दिले आहे.
तसेच आमचे सरकार हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. संपूर्ण समाजाची काळजी घेणारे सरकार आहे. आम्ही सर्वांना घेऊन चालणारे लोक आहोत. पण जर आमच्या हिंदू राष्ट्राच्या विरोधात जर कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर तो शुक्रवारी दोन पायांवर जाणार नाही याची काळजी घेणारेही आम्ही आहोत. त्यामुळे तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही तुमचा विकास करू, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App