प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश राणे आता जामिनासाठी अर्ज करणार आहेत. नितेश राणे सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात आज शरण आले. त्यानंतर त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.Nitesh rane gets judicial custody
त्यामुळे त्यांची जामिनावर सुटका होण्याची शक्यता वाढली आहे. नितेश राणे यांनी न्यायालयात शरणागती पत्करली यामुळे त्यांना पोलिसांकडून अटक करण्याचे कारण उरत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता नितेश राणे यांचे वकील जामिनासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करत आहेत. परंतु, सरकारी पक्षाकडून नितेश राणे यांची 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे.
नितेश राणेंचा अटक पूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. नितेश राणे यांची याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाने त्यांना अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण दिले होते. तसेच नितेश राणे यांनी 10 दिवसांत सिंधुदुर्ग सत्र न्यायालयापुढे शरण जाण्याचे आणि नियमित जामीनासाठी राणे यांनी सत्र न्यायालयात अर्ज करावा असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर जामिनासाठी नितेश राणे उच्च न्यायालयात अर्ज करणार होते. परंतु, अचानक निर्णय बदलत ते जिल्हा सत्र न्यायालयाला शरण आले.
न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर नितेश राणे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो असे म्हणाले आहेत. काल सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने जो निर्णय दिला. त्या निर्णयाचा आदर ठेवून मी आता शरण येत आहे. आतापर्यंत राज्य सरकारने बेकायदेशीर पद्धतीने मला अटक करण्याचा प्रयत्न केला. पण मी आज स्वतःहून न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून शरण येत आहे.” असे नितेश राणे यांनी म्हटले होते. संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर पोलिसांनी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टंगती तलवार होती. अनेक दिवस राणे पोलिसांनाही मिळाले नव्हते. सरकारी पक्षने नितेश राणे यांची 5 दिवसांची पोलीस कोठडी मागितल्यामुळे न्यायालयाने पोलिसांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी नोटीस पाठविली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भावर्यात अडकले. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनि वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशी केली. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App