निशिकांत दुबे यांनी दिली उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचाराची यादी; पण “नॅचरल करप्ट पार्टीच्या” सोबतीची कुणी घ्यायची जबाबदारी??

Nishikant Dubey

नाशिक : निशिकांत दुबे यांनी दिली उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचाराची यादी, पण त्यामुळेच “नॅचरल करप्ट पार्टीच्या” सोबतीची कुणी यायची जबाबदारी??, असा सवाल तयार झाला.Nishikant Dubey gave a list of Uddhav Thackeray’s corruption

भाजपचे बडबोले खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी लोकांविरुद्ध बोलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणले. ठाकरे बंधूंना ठोकता ठोकता निशिकांत दुबे मराठी लोकांवर घसरले. बाहेरच्यांच्या टॅक्स वर मराठी लोक जगतात, असे बोलून बसले. शेवटी देवेंद्र फडणवीस यांना त्या संदर्भात खुलासा करावा लागला. निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यापासून महाराष्ट्र भाजपला अंतर राखावे लागले. पण जे काही झाले ते “पॉलिटिकली कॅल्क्युलेटेड” झाले असेच बोलले गेले. कारण त्यातून मराठी – अमराठी मतांचे ध्रुवीकरण समोर आले.

आता त्याच निशिकांत दुबे यांनी उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचाराची यादी आपल्या सोशल मीडिया हँडल वरून शेअर केली. उद्धव ठाकरे यांचे मुंबईत कुठे आणि किती फ्लॅट आहेत, याची माहिती दिली. ते खरेदी करण्यासाठी त्यांनी पैसा कुठून आणला?, असा सवाल केला. उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचाराच्या पैशातून या मालमत्ता खरेदी केल्याचा त्यांनी दावा केला.



अजितदादांवर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप

पण काहीच वर्षांपूर्वी त्यावेळचे विरोधी पक्ष नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर त्यांच्यावर आणि शरद पवारांवर राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याचा देखील आरोप होता. ती केस आजही न्यायालयात टिकून आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजेच नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीला “नॅचरल करप्ट पार्टी” या शब्दांमध्ये हिणवले होते. धर्म म्हणून नाही, आपद् धर्म म्हणून नाही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर कधीही युती करणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण प्रत्यक्षात मोदींनी ज्यांना “नॅचरल करप्ट पार्टी” म्हटले, ज्या अजित पवारांवर 70000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले, त्यांनाच भाजपने सत्तेच्या वळचणीला आणून बसविले. त्यावेळी दस्तूरखुद्द गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप – राष्ट्रवादी युतीच्या सत्तेच्या वाटाघाटी केल्या.

– ठाकरे – पवार भाजपच्याच वळचणीला बसले

निशिकांत दुबे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या भ्रष्टाचाराची यादी सोशल मीडिया हँडलवर टाकली, त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. पण ठाकरे आणि पवार यांनी भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन सत्ता भोगली. त्याची जबाबदारी कोण घेणार??, हा सवाल यातून समोर आला.

Nishikant Dubey gave a list of Uddhav Thackeray’s corruption; But who should take responsibility for the “Naturally Corrupt Party”??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात