निखिल वागळे विरुद्ध सुजात आंबेडकर; मोदींच्या पराभवासाठी पुरोगामी वर्तुळात प्रचंड घमासान!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशातले सगळे विरोधी राजकीय पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करायला उताविळ झालेच आहेत, पण त्यापेक्षा जास्त उताविळी पुरोगामी वर्तुळातून दिसते आहे. पण यावरूनच या पुरोगामी वर्तुळात सध्या निखिल वागळे विरुद्ध सुजाता आंबेडकर असे प्रचंड घमासान सुरू आहे. Nikhil Wagle Vs Sujata Ambedkar

वंचित बहुजन आघाडी काँग्रेस राष्ट्रवादीला मदत करीत नाही. ते स्वतंत्र लढून भाजपलाच मदत करतात अशा आशयाची टीका निखिल वागळे यांनी केली, त्यावर वंचित बहुजन आघाडीतून निखिल वागळे वर तुफान हल्लाबोल सुरू झाला. त्यातच प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर हे देखील सामील झाले.

सोशल मीडियात यावरून ट्विटर वॉर सुरू झाले. फेसबुक वरून भडीमार सुरू झाला. यातच निखिल वागळे यांचे एक ट्विट आले आणि त्यात त्यांनी सुजाता आंबेडकर यांना थिल्लर या शब्दात संबोधले. त्यामुळे सुजात आंबेडकरांचे समर्थक प्रचंड संतापले. त्यांनी निखिल वागळे यांना वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट वरून जोरदार धमक्या दिल्या. तो वाद थेट ब्राह्मण – ब्राह्मणेतर वादापर्यंत येऊन ठेपला. निखिल वागळे यांनी यासंदर्भात अनेक खुलासे केले. आपण जन्माने सारस्वत ब्राह्मण असलो तरी जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून आलो आहोत. पुरोगामी चळवळीला वाहून घेतले आहे, असे म्हटले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मात्र निखिल वागळे यांनी सुजात आंबेडकर यांना थिल्लर का म्हटले?, यावरून आंबेडकर समर्थक संतप्त झाले असून त्यांनी निखिल वागळे यांचे शरद पवारांच्या बाजूचे अनेक ट्विट शेअर केले आहेत. त्यावरून निखिल वागळे वर जोरदार टीकेची जोड उठली आहे.

अर्थात निखिल वागळे काय किंवा सुजात आंबेडकर काय दोन्ही बाजूंचे समर्थक मोदींच्या पराभवासाठी प्रचंड आक्रमक आहेत. पण सध्या मात्र त्यांच्यातच सोशल मीडियावर घमासान चालल्याचे दिसत आहे.

Nikhil Wagle Vs Sujata Ambedkar

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात