Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराप्रकरणी 16 एप्रिल रोजी पुढील सुनावणी; गुन्हे रद्द करण्याची मागणी

Kunal Kamra

प्रतिनिधी

मुंबई : Kunal Kamra उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबन कविता करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने मुंबई, नाशिक, जळगावात दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या याचिकेवर आज तातडीची सुनावणी झाली आहे. या प्रकरणात आता पुढील सुनावणी ही 16 एप्रिल रोजी होणार आहे. तत्पूर्वी, मद्रास उच्च न्यायालयाने त्याचा अंतरिम अटकपूर्व जामीन 17 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. मुंबई पोलिस अटक करतील या भीतीने त्याने मद्रास हायकोर्टात अर्ज केला होता. तो तामिळनाडूत वास्तव्य करून आहे.Kunal Kamra

कुणाल कामरा यांनी या संदर्भात शिवसेनेने दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. या विषी कामरा याच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, माझ्या अशिलाने मुंबई पोलिसांमोर हजर राहण्यासाठी असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे निवेदन देण्याची तीनदा विनंती केली आहे. मात्र, तरी देखील पोलिस अधिकारी प्रत्यक्ष उपस्थितीचा आग्रह धरत आहेत. त्यासाठी तीन वेळा नोटीस बजावण्यात आली आहे. आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सहकार्य करण्याची विनंती केली हेाती. मात्र, हा काही खून खटला नाही, हा एक विनोदी कार्यक्रम आहे. मात्र, मुंबई पोलिस खून खटला असल्याप्रमाणे या प्रकरणात वागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.



विडंबन कविता करणाऱ्या कामरा विरोधात खार (मुंबई), जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व एफआयआर आता खार पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी कामराला चौकशीला हजर राहण्यासाठी तीन वेळा समन्स बजावले आहेत. परंतु तिन्ही वेळा तो चौकशीला गैरहजर राहिला. सोमवारी त्याचे वकीलद्वय नवरोज सिरवई आणि अश्विन थूल यांनी न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस.एम.मोडक यांच्या खंडपीठाला याचिकेवर त्वरित सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.

न्यायालयाने अंतरिम संरक्षण 17 एप्रिलपर्यंत वाढवले

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई पोलिसांच्या एफआयआरमध्ये कुणाल कामराला देण्यात आलेले अंतरिम संरक्षण न्यायालयाने 17 एप्रिलपर्यंत वाढवले आहे. मुंबईतील खार पोलिसांनी कुणाल कामराविरोधात एफआयआर नोंदवला होता. मद्रास उच्च न्यायालयाने मागील सुनावणीत कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. त्यानंतर आज यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

कुणाल कामराने त्याच्या ‘नया भारत’ शोमध्ये ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील एका गाण्याचे विडंबन करत त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘देशद्रोही’ म्हटले होते. नंतर त्याने ही क्लिप यूट्यूबवरही अपलोड केली. यावर संतप्त झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली होती. तर आमदार मुरजी पटेल यांनी आक्षेप व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मद्रास उच्च न्यायालयाने मागील सुनावणीत कामरा यांना 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. त्यानंतर आज पुन्हा यामध्ये वाढ करण्यात आली असून आता कुणाल कामराला 17 एप्रिलपर्यंत अंतरिम संरक्षण देण्यात आले.

Next hearing in comedian Kunal Kamra case on April 16; Demand to quash charges

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात