प्रतिनिधी
मुंबई : गणेशोत्सवातील सर्व कोरोना निर्बंध शिंदे – फडणवीस सरकारने हटवल्यानंतर मुंबईत ठिकठिकाणी हिंदुंचा सण निर्बंधमुक्त अशी जाहिरात केली. एकप्रकारे सरकारच विघ्नहर्ता असल्याचा संदेश जाहिरातींच्या माध्यमातून दिला. पण ही जाहिरात शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना झोंबली. News of Shinde – Fadnavis government through poignant cartoons
त्या जाहिरातीचा शिवसेनेचे मुखपत्र साप्ताहिक मार्मिकच्या मुखपृष्ठावर व्यंगचित्र छापून ठाकरे गटाने समाचार घेतला आहे. गणपती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खांद्यावर घेतलेले उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची चित्रे रेखाटून मी असताना तुम्ही विघ्नहर्ता? आता विसर्जन करू का तुमचं? असे संवाद बाप्पांच्या मुखी घालण्यात आले आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्ष सर्व सण आणि उत्सव मोकळ्याप्रमाणात साजरे करता आले नव्हते. कोरोनाचे निर्बंध असल्याने लोकांना उत्सवात जास्त सहभागी होता येत नव्हते. परंतु आता कोरोना संकट टळल्याने राज्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने यंदा सणांवरील सर्व निर्बध काढून निर्बंधमुक्त असे सण साजरा करण्याची मुभा दिली. त्यामुळे या सरकारने हिंदुंचे सणांवरील विघ्न दूर अशाप्रकारचे बॅनर मुंबईभर लावले.
या जाहिरातीमुळे शिवसेना आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना मिरच्या झोंबल्या. मार्मिकच्या मुखपृष्ठावर गणपतीचे एक व्यंगचित्र काढण्यात आले आहे. गणपती नदी किनारी उभे असून त्यांच्या पायाखाली लाकडी फळी आहे. या फळीवर गणपतीचा बाप्पांचा एक पाय दाखवला आहे. तर फळीचा निम्म्यापेक्षा भाग हा नदीच्या पाण्याच्या भागावर आहे. त्या फळीच्या दुसऱ्या टोकाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या खांद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेऊन असल्याचे दाखवले आहे.
तर गणपतीच्या मुखी‘ मी असताना तुम्ही विघ्नहर्ता? आता विसर्जन करू का तुमचं?’असा संवाद दाखवला आहे. त्यामुळे सरकारने यंदा निर्बंधमुक्त सण साजरे करायला दिलेली मुभा आणि सणांवरील विघ्न दूर झाल्याची जाहिरात ही ठाकरेंच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मार्मिकमधून व्यंगचित्रातून त्यांनी शिंदे व फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांचा समाचार घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App