नाशिकमधले नवे वेदोक्त प्रकरण; सामाजिक वादाच्या ठिणगीला फुंकर आणि सावरकर गौरव यात्रेला काटशह देण्याचा हेतू?

विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिक मधल्या नव्या वेदोक्त प्रकरणाची क्रोनोलॉजी पाहिली आणि ती नीट समजून घेतली, तर यातले वेगळे राजकीय पैलू निश्चितपणे समोर येताना दिसतील. छत्रपती संभाजी राजे यांच्या पत्नी सौ. संयोगिता राजे यांनी 10 फेब्रुवारी 2023 रोजी काळा रामाला अभिषेक आणि तुलसी अर्चनाचा संकल्प केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 फेब्रुवारी 2023 रोजी संकल्पानुसार पूजा केली. पण त्यातला संकल्प श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त असा सांगितल्याने त्यांनी पुराणोक्त शब्दावर आक्षेप घेतला. New vedokt issue in Nashik to scuttle Savarkar Yatra of BJP?

संयोगिता राजे यांनी 30 मार्च 2023 रोजी सोशल मीडिया अकाउंट वर पोस्ट लिहिली. त्यावर मंदिराचे महंत सुधीरदास पुजारी यांनी 31 मार्च 2023 रोजी आपली बाजू मांडत दिलगिरी व्यक्त करून खुलासा केला. यातही पुराणोक्त शब्दामुळे राणीसाहेबांचा गैरसमज झाल्याचे त्यांनी नमूद केले. संयोगिता राजेंचा मुद्दा संभाजी ब्रिगेडने हातात घेतला आहे. त्यानंतर आज 1 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे दुपारी 3.00 वाजता राज्यघटनेची प्रत श्रीरामाच्या चरणी ठेवण्यासाठी येत आहेत. अनंत करमुसे प्रकरणातील पोलीस वैभव कदम यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. यामध्ये बरेच धागेदोरे महाराष्ट्र पोलिसांच्या हातात आले आहेत.



• 2024 नाशिक लोकसभा निवडणूक

पण एकूण नाशिक मधला वेदोक्ताच्या या नव्या वादाने राजकीय वळण घेतल्याचे हे लक्षण आहे. त्यातले नाशिक लोकसभा मतदारसंघातील 2024 चे संदर्भ पूर्णपणे वेगळे आहेत. छत्रपती संभाजी राजे नाशिक मतदारसंघातून ही निवडणूक लढवू इच्छित आहेत. पण त्यापलिकडच्या सध्याच्या राजकीय घडामोडींसंदर्भात नाशिकचे नवे वेदोक्त प्रकरण वेगळे वळण देणारे ठरणार आहे.

• नॅरेटिव्हला धक्का

1 एप्रिल 2023 पासूनच्या आठवडाभरात महाराष्ट्रात सत्ताधारी भाजप आणि शिवसेना हे सावरकर गौरव यात्रा काढणार आहेत. यासाठी दोन्ही पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. यातल्या काही यात्रा 31 डिसेंबर रोजी बाहेर पडल्या आहेत. महाराष्ट्रात गेल्या 15 – 20 वर्षांमध्ये जो राजकीय आणि सामाजिक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला आहे, तो म्हणजे हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या नॅरेटिव्हला सावरकर गौरव यात्रा छेद देण्याची भीती सध्याच्या विरोधकांना वाटते आहे. त्यातूनच शरद पवारांनी थेट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी बोलून सावरकर विषय बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला, तो काही अंशी यशस्वी देखील झाला आहे. पण म्हणून राहुल गांधींनी केलेला सावरकरांचा अपमान आणि त्यानंतर शिवसेना – भाजप काढत असलेली सावरकर गौरव यात्रा हे दोन्ही विषय थांबण्याची शक्यता नाही आणि त्याचा महाराष्ट्राचा राजकारणावर होणारा परिणामही थांबवता येणारा नाही!

नेमका हाच मुद्दा नाशिकच्या नव्या वेदोक्त प्रकरणाशी वेगळ्या अर्थाने संबंधित आहे. एकीकडे सावरकर गौरव यात्रा थांबवता येणे कठीण आहे आणि दुसरीकडे त्याच्या परिणामांना राजकीय दृष्ट्या तोंड द्यायचे असेल तर आपल्या हाताशी वेगळा मुद्दा नाही, ही विरोधकांची मोठी कोंडी आहे. या कोंडीतून सुटण्यासाठी तर अत्यंत चलाखीने नाशिक मधले नवे वेदोक्त प्रकरण पावणेदोन महिन्यानंतर बाहेर काढण्यात आले नाही ना?, याविषयी राजकीय वर्तुळात दाट संशय आहे.

• भीती कशाची वाटते?

सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात उघडपणे काँग्रेस अलग – थलग पडली. राष्ट्रवादी काँग्रेसला नाईलाजाने सावरकर मुद्द्यावर सावध भूमिका घ्यावी लागली. एकनाथ शिंदेंची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांची त्या मुद्द्यावर एकजूट दिसली. एक प्रकारे शिवसेना भाजप विरुद्ध काँग्रेस – राष्ट्रवादी असा 1990 च्या दशकातला “थेट सामना” उभा राहिला आणि हाच सामना राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला अजिबात परवडणारा नाही. उलट तो काँग्रेसची संस्कृतीतल्या पक्षांसाठी कुठाराघात करणारा ठरण्याची भीती वाटल्यानेच नाशिक मधले नवे वेदोक्त प्रकरण उद्भवले आहे का?? ही महत्त्वाची शंका आहे!!

• अद्याप तरी “थेट” संबंध नाही

अर्थात यामध्ये अद्याप तरी “थेट” कोणत्याही राजकीय नेत्याचा “संबंध” नाही असे दिसते आहे. आज जरी जितेंद्र आव्हाड नाशिकमध्ये येऊन लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार असले, तरी त्यापलीकडे अद्याप तरी बाकीच्या राजकीय नेत्यांचा याच्याशी “संबंध” “दिसत” नाही!! याचा अर्थ तो संबंधच नाही, असे समजणे राजकीय चूक ठरू शकते.

• पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न

कारण एकीकडे महाराष्ट्रात निघणारी सावरकर गौरव यात्रा तर दुसरीकडे विरोधकांच्या हातात ती रोखण्यासाठी मुद्दाच नाही अशा स्थितीत “मुद्द्याची पोकळी” नाशिक मधल्या नव्या वेदोक्त प्रकरणाने भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे!! वेदोक्त प्रकरणातून विशिष्ट सामाजिक वादाच्या ठिणगीला फुंकर घालता येऊ शकते याची पक्की जाणीव काही नेत्यांना आहे!!

• उद्धव ठाकरेंची पंचाईत

इथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची देखील वेगळी पंचाईत होण्याची शक्यता आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरे सध्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पेक्षा प्रबोधनकार ठाकरे यांच्याशी जवळीक साधून आहेत आणि प्रबोधनगारांचा जुन्या वेदोक्त प्रकरणाशी विशिष्ट संबंध होता. याचा अर्थच राजकीयदृष्ट्या सावरकर गौरव यात्रेला नाशिक मधल्या नव्या वेदोक्त प्रकरणाने प्रकरणातून काटशह द्यायचा आहे का?, असा संशय आता वाढतो आहे.

New vedokt issue in Nashik to scuttle Savarkar Yatra of BJP?

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात