अखेर जाहीर झाला राज्यातील महिलांसाठी नवा टोल फ्री क्रमांक ; यशोमती ठाकूर यांनी दिली माहिती


महिला आयोगाने तयार केलेल्या कॅलेंडर व डायरीचे देखील अनावरण या दिवशी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे.New toll free number for women in the state finally announced; Information given by Yashomati Thakur


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या स्थापनेला येत्या २५ जानेवारीला २९ वर्ष पूर्ण होत आहेत.यानिमित्ताने मुबई मध्ये यशवंतराव चव्हाण केंद्रातील ‘रंगस्वर सभागृहात’वर्धापनदिनाचा कार्यक्रम होणार आहे.तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

विशेष म्हणजे वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमात राज्यातील महिलांसाठी टोल फ्री क्रमांकाचे अनावरण करण्यात येणार आहे. सोबतच महिला आयोगाने तयार केलेल्या कॅलेंडर व डायरीचे देखील अनावरण या दिवशी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे.



दरम्यान राज्यातील महिलांसाठी नवा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला असून आता महिलांना 155209 या टोल फ्री क्रमांकावरुन महिलांना तक्रार करता येणार आहे.येत्या 7 ते 8 दिवसात हा टोल फ्री क्रमांक कार्यरत होईल. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

तसेच पुढे यशोमती ठाकूर म्हणाल्या की , ‘आरे ला कारे’ म्हणण्याची ताकद महिलांमध्ये असली पाहिजे.विचार केला तर फकत महिलांवरील अत्याचार खालच्या वर्गातच होत नाहीत, तर चांगल्या घरातही होत आहेत.महत्वाची बाब म्हणजे विशाखा समितीची स्थापन केली असली त्याची अंमलबजावणी होत नाही, अशी खंतही यशोमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

New toll free number for women in the state finally announced; Information given by Yashomati Thakur

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात