संगीत नाट्य स्पर्धेचे आता नवे नामकरण ‘संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा’

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाराष्ट्र राज्य मराठी हौशी संगीत नाट्य स्पर्धेचे आयोजन होते. तिचे नामकरण ‘संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा’ असे करण्यास शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या स्पर्धेस संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त नाव देण्याबाबत विनंती करण्यात आली होती. New renaming of Sangeet Natya competition ‘Sangitsurya Keshavrao Bhosale Music Drama Competition’

केशवराव भोसले हे मराठी नाट्य सृष्टीतील ज्येष्ठ व श्रेष्ठ गायक अभिनेते होते.

सन १८९० पासून त्यांनी संगीत शारदा, संगीत सौभद्र, संगीत मृच्छकटीक, संगीत मानापमान अशी अनेक अजरामर नाटके सादर केली. संगीत नाटक या प्रकारातील एक अतुलनीय अभिनेते व गायक म्हणून त्यांचा गौरव व्हावा, या उद्देशाने स्पर्धेचे ‘संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा ‘असे नामकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.



उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्या कलागुणांमधून व्यक्तिमत्व विकास घडवून आणावा, नाट्य कलेचा प्रचार व प्रसार सर्वस्तरातून व्हावा, सांस्कृतिक वातावरण तयार व्हावे, हा उद्देश ठेऊन शासन राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन गेली ६० वर्ष करीत आहे.

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी राज्य स्तरावर हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यातीलच राज्य हौशी मराठी संगीत नाट्य स्पर्धा ही एक राज्यस्तरीय स्पर्धा आहे.

New renaming of Sangeet Natya competition ‘Sangitsurya Keshavrao Bhosale Music Drama Competition’

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात