सध्या बेस्टकडे 2783 बस असून त्यापैकी 875 इलेक्ट्रिक आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : BEST Multiple मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमा’ची आढावा बैठक पार पडली. बैठकीत मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या सुलभीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.BEST Multiple
मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि वेळेवर होण्यासाठी अत्याधुनिक व वातानुकूलित बससेवा, प्रवाशांना बस कुठे आहे याची थेट माहिती मिळावी यासाठी जीपीएस प्रणाली आणि उत्पन्नवाढीसाठी विविध सुधारणा राबवण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री म्हणाले, उत्पन्न वाढीसाठी वांद्रे, दिंडोशी आणि देवनार येथील बस डेपोचा पुनर्विकास करताना व्यावसायिक गाळे, रहिवासी प्रकल्प यांचा समावेश करावा. विशेषतः मराठी सिनेमासाठी पाच ठिकाणी थिएटर उभारणीचा विचारही यावेळी मांडण्यात आला. बेस्टच्या आर्थिक स्थैर्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात वाहतुकीसाठी किमान तीन टक्के निधी राखून ठेवण्याची शिफारसही करण्यात आली.
सध्या बेस्टकडे 2783 बस असून त्यापैकी 875 इलेक्ट्रिक आहेत. 2027 पर्यंत सर्व बस पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा मानस असून, त्यासाठी आणखी 2400 बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. बस किती वेळात येणार याची माहिती अॅपमार्फत मिळावी यासाठी बेस्ट गुगलसोबत जीपीएसकरता करार करणार आहे.
याशिवाय मेट्रो, लोकल, मोनोरेल आणि बस यांना एकत्र जोडणाऱ्या एकत्रित मोबिलिटी प्लॅटफॉर्मचा लाभ बेस्टला मिळणार आहे. बैठकीत बेस्ट व्यवस्थापनाने टोल माफी, सरकारी करमाफी आणि कर्मचाऱ्यांच्या थकबाकीबाबतही मागण्या मांडल्या, त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App