आर्थर रोड जेलमध्ये विशेष सुविधायुक्त नव्या 9 व्हीआयपी बराकी!!; पण तयारी कुणासाठी??

प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात 9 नवीन बॅरेक तयार करण्यात येत आहेत. या नवीन बराकींची ओळख व्हीआयपी बॅरेक म्हणून असणार आहे. आर्थर रोड तुरुंगातील वाढती कैद्यांची संख्या पहाता कारागृहात नवीन बॅरेक तयार करण्यात येत असल्याची माहिती कारागृह अधिकारी यांनी म्हटले आहे. मात्र या व्हीआयपी बराकी नेमक्या कुठल्या नवीन व्हीआयपी कैद्यांसाठी केल्या जात आहेत??, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. New 9 VIP barracks with special facilities in Arthur Road Jail

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत माजी पोलीस महासंचालक संजय पांडे हे आधीच आत मध्ये आहेत. यामध्ये आता कोणत्या व्हीआयपींची भर पडणार आहे??, याची चर्चा आता सोशल मीडियावर सुरू आहे. ती नावे उघडपणे सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यामुळे जेल मधल्या नव्या बराकी या व्हीआयपी कैद्यांसाठी राखून ठेवल्या आहेत का??, असा सवालही सोशल मीडियावर विचारला जात आहे.

मुंबईतील आर्थर रोड मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. बॉलिवूड अभिनेता संजय दत्त, दाऊद टोळीतील गँगस्टर, बडे उद्योगपती, राजकारणी आणि अतिरेकी अजमल कसाब यांना वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अटक झाली आणि त्यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली. त्या प्रत्येक वेळी आर्थर रोड कारागृह चर्चेत आलेच आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि माजी मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची रवानगी आर्थर रोड कारागृहातच आहेत.

अशी असणार सुविधा

आर्थर रोड कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले ते नवीन व्हीआयपी बॅरेकमुळे २ एकरमध्ये विस्तारलेल्या आर्थर रोड कारागृहात ९ नवीन बॅरेक तयार करण्यात येत आहेत. हे बॅरेक सामान्य बॅरेक नसून व्हीआयपी बॅरेक करण्यात येणार आहे. या बराकींमध्ये पाश्चिमात्य टॉयलेट, टेलिव्हिजन सेट, पंखे, उशी, बेड इत्यादी सुविधा असणार आहे. तसेच बॅरेकमध्ये सूर्यप्रकाश येण्यासाठी खास सुविधा करण्यात येणार आहे. व्हीआयपी बॅरेक तयार करण्यामागे काय कारण असावे असा प्रश्न अनेकांना पडला आहे, आणखी काही घोटाळेबाज नेते, उदयोगपतीना अटक करण्यात येणार असल्याचे व त्यांची रवानगी या व्हीआयपी बॅरेकमध्ये करण्यात येणार आहे का? अशी चर्चा सुरू आहे.

२०१९ मध्ये नवीन बॅरेकला मंजुरी

मात्र याबाबत कारागृह प्रशासनाने इन्कार केला असून नवीन बॅरेक करण्याचा प्रस्ताव हा जुना असून २०१९ मध्ये त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे, व सप्टेंबर २०२० मध्ये या बॅरेकचे काम सुरू करण्यात आलेले आहे. आर्थर रोड करगृहात क्षमतेपेक्षा तीन पटीने कैदी भरले गेले आहे, करगृहातील कैद्यांची क्षमता वाढविण्यासाठी हे बॅरेक बांधण्यात येत आहे. या बॅरेकमध्ये सामान्य बॅरेक सारखीच रचना असणार आहे, केवळ या ठिकाणी टॉयलेटचे भांडे हे पाश्चिमात्य असेल, बॅरेक मध्ये वातानुकूलितची सुविधा नसणार आहे, केवळ पंखे लावण्यात येईल, इतर बॅरेक मध्ये ज्या पद्धतीने टेलिव्हिजन संच आहे तसाच संच या बॅरेक मध्ये असणार असल्याची माहिती कारागृह सूत्रांनी दिली आहे.

New 9 VIP barracks with special facilities in Arthur Road Jail

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात