यशवंतराव समाधी जवळ पवारांचा अजितदादांचे नाव न घेताच भाजपवर टीकेचा रोख; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम!!


प्रतिनिधी

कराड : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कथित बंडा नंतर त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त करण्यासाठी आणि पक्ष बांधणीच्या नव्या सुरुवातीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपले राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी प्रीती संगमावर आज आले. पण तेथे केलेल्या भाषणात पवारांनी थेट अजितदादांचे नाव घेणे टाळले आणि आपल्या सर्व भाषणाचा रोख त्यांनी भाजप विरोधात ठेवला. आजच्या गुरुपौर्णिमेचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात सगळ्यात शेवटी केला. Near Yashwantrao Samadhi, Pawar criticized BJP without mentioning Ajit Dada’s name

भाजपच्या फोडाफोडीच्या प्रवृत्तीला आपल्यातले काही लोक बळी पडले, एवढाच उल्लेख करून पवारांनी अजितदादांचे नाव घेणे टाळले. हा महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचा आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. येत्या वर्ष सहा महिन्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये जातीयवादी प्रवृत्तींना हा महाराष्ट्र गाडून टाकेल, असे वक्तव्य पवारांनी करून अजितदादांवर थेट टीका करण्याचे टाळले.
पवारांनी आपले छोटेखानी भाषण एवढे सौम्य ठेवले, की पवारांचा अजितदादांना आतून पाठिंबा आहे किंवा कसे, याविषयी महाराष्ट्राच्या मनात परत संभ्रम निर्माण झाला.

अजितदादांपुढे पक्ष सरेंडर

त्यापूर्वी कराडच्या वाटेवर असताना पवारांनी पक्ष चिन्ह गेले तरी चालेल, आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ, असे वक्तव्य केले त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजितदादांपुढे सरेंडर केल्याचेच सूचित केले होते. त्यानंतर कराड मधल्या प्रीतीसंगमावरच्या भाषणात त्यांनी अजितदादांचे नावही घेतले नाही. केवळ भाजपच्या फोडाफोडीच्या प्रवृत्तीला आपल्यातले काही लोक बळी पडले एवढाच उल्लेख केला. त्यामुळे पवार आत्ताही नवीन पक्ष बांधणी करण्याचे वक्तव्य करत असले तरी आतून अजितदादांना पवारांच्या पाठिंबा आहे किंवा कसे, याविषयी कार्यकर्त्यांच्या मनात पुन्हा संशय निर्माण झाला आहे.

Near Yashwantrao Samadhi, Pawar criticized BJP without mentioning Ajit Dada’s name

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात