विशेष प्रतिनिधी
पुणे : बंडातात्या कराडकर यांनी अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केले. त्यामुळे बंडातात्या कराडकर यांच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील संत ज्ञानेश्वर पादुका चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. NCP’s ‘Jode Maro’ movement Protest of Bandatatya Karadkar
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून कराडकर यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कराडकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व करत असताना प्रशांत जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. वारकरी संप्रदायात बंडातात्या कराडकर यांच्यासारख्या वाईट प्रवृत्तींनी घुसखोरी केली आहे. वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलिन करण्याचा हा सुनियोजित कट असू शकतो. ही बाब वेळीच ओळखून अशा प्रवृत्तींना बाजूला करावे असे आवाहन जगताप यांनी केले.
अंकुश काकडे,राजलक्ष्मी भोसले,प्रदीप देशमुख, मृणालिनी वाणी, अशोक खांदवे,ॲड.रुपाली पाटील,महेश हांडे,किशोर कांबळे,गणेश नलावडे,अजिंक्य पालकर,मनोज पाचपुते आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App