प्रतिनिधी
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ही जागा काँग्रेसकडून खेचून घेण्याचा चंग राष्ट्रवादी काँग्रेसने बांधला आहे. यासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार आग्रही आहेत. पण यामुळे महाविकास आघाडीच्या वज्रमूठीची सर्व बोटे ढिल्ली पडली आहेत.NCP trying to snatch pune loksabha constituency from Congress to fight against BJP
पुणे लोकसभा मतदारसंघात केव्हाही पोटनिवडणूक जाहीर होऊ शकते. पुण्यात नियमित राजकीय संघर्षात लोकसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस ही वर्षानुवर्षाची पारंपारिक लढत आहे. पण आता त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस उतरून ही जागा काँग्रेसकडून खेचून घेण्याचा चंग पक्षाने बांधला आहे. पुण्याच्या जागेवर काँग्रेसचा हक्क आहे, असे वक्तव्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्यावर पण पुण्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद काँग्रेस पेक्षा जास्त आहे, असे सांगून अजित पवारांनी पुणे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा ठोकला आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार भाजप उमेदवाराशी चांगली टक्कर देऊन ही जागा महाविकास आघाडीकडे खेचून आणू शकतो, असा दावा अजितदादांनी केला आहे.
पण यात भाजपचा पराभव करण्यापेक्षा पुण्याची जागा काँग्रेस कडून राष्ट्रवादी काँग्रेस कडे खेचून घेण्याचाच जोरदार प्रयत्न पक्षाने चालविल्याचे दिसून येते. कारण लोकसभा पोटनिवडणुकीतील लढतीचे परिणाम आगामी महापालिका निवडणुकांवर ताबडतोब दिसणार आहेत आणि तेथेच राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे महापालिकेत भाजपशी टक्कर घेऊन काँग्रेसला बाजूला सारून सत्ता स्वतःकडे खेचून आणायचे आहे. त्यामुळेच पुणे लोकसभा मतदारसंघावर अजितदादांनी दावा सांगून काँग्रेस कडून ही जागा खेचून घेण्याचा चंग बांधला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App