विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sharad Pawar मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीतील जागावाटपाच्या चर्चेला राष्ट्रवादी (श. प.) पक्षाच्या शनिवारच्या बैठकीतून अधिकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवावी, अशी तीव्र भावना कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केली.Sharad Pawar
मतदार यादीच्या घोळावर एकत्र येता, मग निवडणुकीत मनसे का नको, असा सवालही राष्ट्रवादीने काँग्रेससमोर उपस्थित केला आहे. पक्षनेते व कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी केवळ काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) इतकेच नव्हे, तर डावे पक्ष तसेच आंबेडकर, खरात व जानकरांसारख्या आंबेडकरवादी पक्षांसोबत आघाडीचा आग्रह केला.Sharad Pawar
मनसेसोबत आघाडीवरून काँग्रेसमध्ये दुफळी
महापालिका निवडणुकीत मनसेशी युती करण्यावरून काँग्रेसमध्ये दुफळी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षातील नेते विजय वडेट्टीवार यांनी एकत्र निवडणूक लढण्याला अनुकूलता दर्शविली. दुसरीकडे, या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई काँग्रेसने आधीच स्पष्ट केले आहे की काँग्रेस कधीही कायदा हातात घेणाऱ्या आणि इतरांना धमकावणाऱ्या लोकांशी हातमिळवणी करणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App