नाशिक : डिवचून आणि दमदाटी करून राष्ट्रवादीवाले नामानिराळे, तर narrative setting मध्ये भाजपवाले उणे!!, हेच चित्र जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या वादातून समोर आले. भाजपवाले कारण नसताना अपराध बोधात (guilt feeling) गेले.
वास्तविक या सगळ्या प्रकरणाची सुरुवात जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणून डिवचण्यातून झाली. त्यामुळे सगळा राडा सुरू झाला. वास्तविकी केस खूप जुनी आणि केव्हाच निपटलेली होती, तरी देखील जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळाच्या आवारातच गोपीचंद पडळकर यांना मंगळसूत्र चोर म्हणून डिवचले. या डिवचण्याचे रूपांतर अखेर विधिमंडळ परिसरातल्या मारामारीत झाले, पण आता विधिमंडळ परिसरात झालेल्या मारामारीचे राजकीय भांडवल करून सगळे “राष्ट्रवादी संस्कारित” एटवटले. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार + जितेंद्र आव्हाड हे देखील एक झाले आणि त्यांनी “राष्ट्रवादी संस्कारित” विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देखील “कडक” कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. हे सगळे ठरवून घडले. या सगळ्यामध्ये केवळ मारामारीच्या घटनेकडे isolation मध्ये बघून भाजपवाले narrative setting मध्ये कमी पडले.
– लढाईत पडळकर एकटे
वास्तविक भाजपने संपूर्ण घटनाक्रम नीट पाहून राष्ट्रवादीवाल्यांना देखील अडचणीत आणायला हवे होते. विधिमंडळाच्या आवारात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आवड मंगळसूत्र म्हणून चोर म्हणून चिडवले, त्यावर सगळ्यांनी एकवटायला हवे होते. ही केवळ आव्हाड आणि पडळकर यांच्यातली लढाई ठेवण्याऐवजी दोन पक्षांमधली लढाई असे समजून लढायला हवे होते, पण भाजपवाल्यांनी पडळकर यांना लढायला एकटेच सोडून दिले. त्याचे परिणाम राजकीय दृष्ट्या अपरिपक्व असलेल्या किंवा “राजकारणात” “तयार” नसलेल्या कार्यकर्त्यांनी मारामारीत केले. त्यामुळे “राष्ट्रवादी संस्कारितांना” विधिमंडळाचे पावित्र्य, कायद्याचा भंग वगैरे बाता मारता आल्या. वास्तविक हे “राष्ट्रवादी संस्कारित” जितेंद्र आव्हाड काय किंवा रोहित पवार काय, सक्षणा सलगरच्या मुक्ताफळांकडे हसत पाहत होते. हेच “राष्ट्रवादी संस्कारित” जयंत पाटील हे अमोल मिटकरी यांच्या ब्राह्मण समाजाविरुद्धच्या भाषणाच्या वेळी हसून टाळ्या पिटत होते.
– आव्हाडांना वेळीच धडा शिकवायला हवा होता
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आज जरी भाजपचे असले तरी ते मूळात “राष्ट्रवादी संस्कारित” आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मांडवा घालून आले आहेत, हे विसरून कसे चालेल?? या सगळ्यात भाजपवाल्यांनी गोपीचंद पडळकर यांना एकट्याला दोषी ठरविले, पण जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना कसे डिवचले आणि त्याचा भडका नंतर कसा उडाला, या घटनाक्रमाकडे फारसे लक्ष दिले नाही. संपूर्ण प्रकरणात राष्ट्रवादीवाल्यांना ठोकून काढण्यात भाजपवाले कमी पडले. उलट विधिमंडळाचे पावित्र्य वगैरे बाता त्यांना ऐकायला लागल्या. भाजपवाल्यांनी वेळीच राष्ट्रवादीवाल्यांवर प्रतिहल्ला चढवला असता, तर ही वेळ आली नसती. याच जितेंद्र आव्हाडांनी अनंत करमुसेला घरात नेऊन मारले, तो विषय भाजपने तापविला पण तो logical end ला नेऊन जितेंद्र आव्हाड यांना धडा शिकवला नाही आणि आता गोपीचंद पडळकर प्रकरणात पडळकर यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेय.
– रोहित पवारांची पोलिसांना दमदाटी
या सगळ्या एपिसोड मध्ये काल रात्री रोहित पवारांनी पोलिसांना दमदाटी केली याबद्दल अजून तरी भाजपवाले काही बोलले नाहीत. स्वतःचा आवाज चढवून ते पोलिसांना आवाज खाली करायला सांगत होते नितीन देशमुख अटक प्रकरणात त्यांना आणखी राडा घालायचा होता. पण त्यावेळी भाजपवाल्यांनी आक्रमक भूमिका घेऊन त्यांना ठोकले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App