विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचा 2023 24 चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्र विधानसभेत सादर केल्यानंतर आज आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांनी विधिमंडळाच्या दारात भोपळे हाती घेऊन मोठे आंदोलन केले. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात शिंदे – फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना हाती भ्रमाचा भोपळा दिला. त्यांना प्रत्यक्षात काहीच मदत दिली नाही, असा आरोप करून मोठ्या घोषणाही दिल्या. सोलापुरात शिवसेनेच्या ठाकरे गटाने अर्थसंकल्पाला गाजर असे संबोधत फुकट गाजर वाटण्याचे आंदोलन केले. NCP MLAs agitations with pumpkins infront of maharashtra legislature
पण भोपळे, टरबूज, पडवळ ही प्रतीके निदान महाराष्ट्राच्या राजकारणात तरी नवीन नाहीत. राष्ट्रवादीचे फॉलोवर्स देवेंद्र फडणवीस यांना अनेकदा टरबूज म्हणून ट्रोल करतच असतात. पण हातात भोपळे घेऊन आंदोलन करणाऱ्या या नेत्यांना आणि त्यांच्या फॉलोवर्स बिनचोचीचा सुतारपक्षी आणि मैद्याचे पोते हे आठवते आहे का??
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक आपल्या व्यंगचित्रकलेच्या कारकिर्दीत अनेक नेत्यांना वेगवेगळे प्राणी, पक्षी बनवले होते. त्यातच त्यांनी शरद पवारांचे एक व्यंगचित्र बिनचोचीचा सुतारपक्षी काढून सत्तेच्या खुर्चीचा पाय मोडत असल्याचे दाखवले होते. अनेकदा महाराष्ट्रातल्या जाहीर सभांमध्ये बाळासाहेबांनीच शरद पवारांची संभावना मैद्याचे पोते म्हणून केली होती. माझ्याकडे बघा तुम्हाला हाडंच हाडं दिसतील, पण त्यांच्याकडे बघा शोधूनही हाड सापडणार नाही, इतके ते गोल गरगरीत आहेत, अशी खोचक टिपणी बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःच्याच फोटो बायोग्राफीच्या प्रकाशन समारंभात केली होती.
हे सगळे आठवायचे कारण राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधान भवनाच्या दारात हातात मोठे भोपळे घेऊन केलेले आंदोलन आणि शिवसेनेचे सोलापुरातले गाजर फुकट वाटप आंदोलन हे होते. यातून आपल्याला जरी बिन चोचीचा सुतार पक्षी आणि मैद्याचे पोटे आठवले असले तरी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांना ते आठवले असेल काय??, इतकाच प्रश्न!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App