नाशिक : पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडी नकोच, अशी भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घेतली. त्यावरून पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे उघड झाले. प्रशांत जगताप एकीकडे आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दुसरीकडे अशी राजकीय स्थिती पुण्यात निर्माण झाली.
पण त्या पलीकडे जाऊन पवार काका – पुतण्यांच्या दोन्ही राष्ट्रवादींचे नेते मात्र भाजपचे उमेदवारी अर्ज येण्यासाठी भाजपच्या कार्यालयाच्या दारात रांगेत उभे राहिले. किंबहुना आपले राजकीय भवितव्य धोक्यात आल्याचे लक्षात आल्यानेच, भाजपच्या कार्यालयाच्या दारात उभे राहायला लागले तरी चालेल, पण तिथूनच उमेदवारी अर्ज नेऊ, असे म्हणायची वेळ दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांवर आली.
आता महापालिका निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील. या पार्श्वभूमीवर भाजपने पुण्यात महायुती म्हणून किंवा स्वबळावर म्हणून अशी दोन्ही पद्धतीने निवडणुका लढवायची तयारी चालू केली असून त्याच्या पहिल्या टप्प्यात इच्छुकांकडून विशिष्ट मुदतीत आणि पद्धतीत अर्ज मागविले. भाजपमधून निवडणूक लढवण्याची इच्छा असणाऱ्यांची संख्या पुण्यात सर्वाधिक भरली. बाकीच्या पक्षांच्या नेत्यांनी सुद्धा भाजपच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर उमेदवारी अर्ज नेण्यासाठी रांगा लावल्या. रांगेत उभे राहून उमेदवारी अर्ज नेलेल्यांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदाराच्या मुलाचाही समावेश झाला. त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविकेच्या मुलाने आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातल्या महापालिका प्रभागामधल्या माजी नगरसेवकाने सुद्धा भाजपचे अर्ज नेले. काँग्रेसच्या माजी उपमहापौरांच्या मुलाने देखील रांगेत उभे राहून भाजपचा अर्ज नेला. भाजप सोडून बाकीच्या सगळ्या पक्षांमधल्या साधारण 15 लोकांनी उमेदवारी अर्ज नेल्याची माहिती समोर आली.
– डिपॉझिट जाण्याची भीती
पवार काका – पुतण्यांच्या राष्ट्रवादींची आघाडी झाली, तरच दोन्ही पक्षांचे काही उमेदवार पुणे महापालिकेत निवडून येतील. अन्यथा ती आघाडी झाली नाही, तर दोघांची डिपॉझिट सुद्धा वाचणार नाहीत, असे दोन्ही पक्षांत सामील झालेले माजी नगरसेवक उघडपणे बोलले. पवार काका – पुतण्यांचे असेच तळ्यात – मळ्यात राहिले, तर आपले वैयक्तिक राजकीय भवितव्य धोक्यात येईल, या भीतीने अनेकांनी भाजपच्या कमळाखाली आपला आश्रय शोधायचा प्रयत्न चालविला. यातूनच पवार काका – पुतण्याच्या राष्ट्रवादींच्या नेत्यांवर भाजप कार्यालयाच्या दरवाजासमोरच्या रांगेत उभे राहून उमेदवारी अर्ज न्यायची वेळ आली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App