प्रतिनिधी
पुणे : मध्यंतरी मटन खाल्ल्यामुळे शरद पवारांनी दगडूशेठ गणपतीचे मंदिरात जाऊन दर्शन घेणे टाळले. त्यांनी मंदिराबाहेर उभे राहूनच हात जोडले. मात्र आता मटन खाऊन सुप्रियाताईंनी भैरवनाथ आणि महादेवाचे दर्शन घेतले. असे घडल्याचे माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. ncp leader supriya sule eat mutton non veg food before visting temple says eknath shinde camp vijay shivtare
बारामतीच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यात वेगवेगळ्या देवदेवतांचे दर्शने घेतल्याचे फोटो आपल्या सोशल मीडिया हँडल वरून शेअर केले होते. याच दौऱ्या दरम्यानचा एक व्हिडिओ विजय बापू शिवतारे यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वर शेअर करून सुप्रिया सुळे यांनी मटन थाळी खाल्ल्याचा उल्लेख केला आहे आणि त्याच दौऱ्यात त्यांनी भैरवनाथ महादेव संत सोपान काका यांची दर्शने घेतल्याचाही फोटो शेअर केला आहे.
सुप्रिया सुळे यांच्या संदर्भातील बातम्या मराठी माध्यमांनी प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर या प्रकाराची जोरदार चर्चा असून अनेकांना शरद पवारांनी मटन खाल्ल्यामुळे दगडूशेठ गणपतीचे बाहेरून दर्शन घेतल्याची आठवण झाली आहे. अनेकांनी सुप्रिया सुळे यांच्या कृतीवर बोट ठेवत टीकास्त्र सोडले असून अनेकांनी विजयबापू शिवतरेंवर देखील टीकास्त्र सोडले आहे सोशल मीडियात ही बातमी जोरदार ट्रेंड होते आहे.
शरद पवार मध्यंतरी भिडे वाड्याच्या पाहणीच्या निमित्ताने पुण्यात बुधवार पेठेत गेले होते. भिडे वाड्याची पाहणी करून त्यांनी दगडूशेठ मंदिर परिसराची ही पाहणी केली. मंदिर ट्रस्टने फरासखाना पोलीस स्टेशनची काही जागा स्वतःसाठी मागितली आहे, त्या जागेची पवारांनी पाहणी केली. मात्र त्यावेळी त्यांनी दगडूशेठ मंदिरात जाऊन गणपती दर्शन घेण्याचे टाळले. त्यांनी बाहेरूनच हात जोडले होते. आपण मांसाहार केल्याने मंदिरात जात नसल्याचे शरद पवार म्हणाल्याचे पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले होते.
आता मात्र सुप्रिया सुळे यांनी आपण हीच थाळी खाल्ली असा उल्लेख केलेला व्हिडिओ विजय बापू शिवतारे यांनी शेअर करून त्यानंतरची त्यांची देवदर्शन यांचे फोटो देखील शेअर केले आहेत. त्यामुळेच सोशल मीडियातून सुप्रिया सुळेंवर शरसंधान सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App