प्रतिनिधी
कराड : 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार मुदत संपण्याआधीच पाडले. ते पाडून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला फायदा करून दिला, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.NCP helped BJP in 2014 by bringing down the government; Prithviraj Chavan targets Pawar
कराडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी काँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेवर भाष्य केले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसवरील शरसंधान साधले. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच दुटप्पी वागली आहे. त्यांनी 2014 मध्ये आघाडीचे सरकार मुदतीपूर्वी पाडले आणि त्याचा फायदा भाजपला करून दिला. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस सत्तेवर येऊ शकले, अशा शब्दात चव्हाण यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसला गुजरात मध्ये चांगली संधी आहे. हिमाचल प्रदेशामध्ये देखील काँग्रेस योग्य नियोजन केल्यास सत्तेवर येऊ शकते. दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली नियोजन करून मजबुतीने निवडणूक लढवणार आहे. त्याचा नक्की फायदा पक्षाला होईल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App