विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशात इतरत्र अनेक घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा जाण्याचा धोका उत्पन्न झाल्यानंतर शरद पवारांनी आपल्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार खासदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा टिकवून ठेवण्यासाठी नेमके काय करावे?, याचबरोबर महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवरील भूमिका निश्चित करणार करण्यात येत आहे. NCP chief Sharad Pawar is chairing a party review meeting of NCP MPs, MLAs and senior party leaders at the party office in Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस सह बहुजन समाज पक्ष तृणमूल काँग्रेस कम्युनिस्ट पार्टी या देशातल्या अनेक पक्षांना केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्या राष्ट्रीय दर्जा विषयी विचारणा करणारी नोटीस पाठवली आहे. या नोटीशीवर निवडणूक आयोग याच आठवड्यात अंतिम निर्णय घेणार असल्याची खात्रीलाय बातमी आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पवारांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.
सावरकर मुद्द्यामागे आघाडीची फरफट
त्याच वेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा सुरू झाल्या आहेत. पण या सभांमध्ये देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राहुल गांधींनी केलेला अपमान आणि त्यावर शिवसेना भाजप यांनी काढलेली सावरकर गौरव यात्रा या मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलावे लागत आहे. एक प्रकारे शिवसेना – भाजपच्या सावरकर अजेंड्या पाठीमागे महाविकास आघाडीची राजकीय फरफट होत आहे. त्यामुळे ही फरफट टाळून महाराष्ट्रात वेगळ्या मुद्द्यावर अजेंडा राबवता येईल का किंवा वेगळा कुठला सामाजिक – राजकीय अजेंडा काढता येईल का?, या मुद्द्यावर देखील राष्ट्रवादीचे आजच्या बैठकीत खल सुरू असल्याची आतली माहिती आहे.
NCP chief Sharad Pawar is chairing a party review meeting of NCP MPs, MLAs and senior party leaders at the party office in Mumbai; likely to address the media after the meeting. (File Pic) pic.twitter.com/pvVtclgJBl — ANI (@ANI) April 4, 2023
NCP chief Sharad Pawar is chairing a party review meeting of NCP MPs, MLAs and senior party leaders at the party office in Mumbai; likely to address the media after the meeting.
(File Pic) pic.twitter.com/pvVtclgJBl
— ANI (@ANI) April 4, 2023
वेदोक्त – पुराणोक्त वाद
काही दिवसांपूर्वी नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त – पुराणोक्त प्रकरणावरून कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी राजे यांच्या पत्नी संयोगिता राजे यांचा वाद झाला होता. त्यांनी त्या संदर्भात सोशल मीडिया अकाउंट वरून पोस्ट केली होती. त्यानंतर महंत सुधीर दास यांनी त्यासंदर्भात खुलासा केला होता. त्या मुद्द्यावर स्वतः छत्रपती संभाजीराजे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये वेदोक्त पुराणोक्त अर्थात ब्राह्मण – ब्राह्मणेतर असा एक वेगळा वाद पुन्हा डोके वर काढू पाहत आहे.
पवार घेणार पत्रकार परिषद
या सामाजिक वादाची पार्श्वभूमी देखील आजच्या राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी महत्त्वाची आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत या वादा संदर्भात नेमकी काय भूमिका घ्यायची??, यावरून देखील चर्चा होऊ शकते. या बैठकीनंतर स्वतः शरद पवार पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीची राजकीय आणि सामाजिक भूमिका जाहीर करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App