Thackrey brothers “मी आणि शबाना फुटपाथवर झोपतो का?” पाकिस्तानच्या बुशरा अन्सारीवर जावेद अख्तर यांचा उपरोधिक पलटवार

Thackrey brothers

नाशिक : राष्ट्रवादीच्या पोस्टर रोगाची सैनिकांनाही लागण झाली आहे म्हणून ज्या पद्धतीने पोस्टर वर चढतात राष्ट्रवादीचे हौशी मुख्यमंत्री, त्याप्रमाणे सैनिक घडवतात ठाकरे बंधूंची युती असला प्रकार सगळ्या महाराष्ट्रात दिसून येतोय.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आपल्या बड्या नेत्यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेले पाहण्याची फार मोठी हौस आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही बड्या नेत्याचा वाढदिवस आला की त्याचे समर्थक त्या नेत्याला पोस्टर वरच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर चढवतात. त्याला अगदी पहिल्या टर्मचे आमदार रोहित पवार देखील अपवाद ठरले नव्हते. ते केवळ पवारांचे नातू असल्यामुळे पहिल्याच टर्ममध्ये ते पोस्टरवरच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर चढून बसले. पण अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील या तिन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री पदाची स्पर्धा आत्तापर्यंत अनेकदा पोस्टर वरच लागली. प्रत्यक्षात राजकीय कर्तृत्वाच्या त्यापैकी कुणालाही कधी मुख्यमंत्री होता आले नाही. शरद पवार देखील कोणालाही मुख्यमंत्री करायचा पण फंदात पडले नाहीत. कारण महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना तसा कधी कौल दिला नाही, पण म्हणून पोस्टरवरच्या मुख्यमंत्र्यांची हौस काही भागली नाही. ते भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरवर चढतच राहिले.

– ठाकरे बंधूंच्या ऐक्याची पोस्टर्स

राष्ट्रवादीच्या याच पोस्टर रोगाची शिवसैनिकांना आणि मनसैनिकांना लागण झाली. पण ती भावी मुख्यमंत्रीपदाची नसून केवळ ठाकरे बंधूंच्या ऐक्याची लागण झाली.‌ ठाकरे बंधूंच्या ऐक्याची चर्चा सुरू झाल्याबरोबर दोन्ही पक्षांतल्या सैनिकांना उत्साहाचे उधाण आले आणि त्यांनी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर या शहरांमध्ये ठाकरे बंधूंचे ऐक्य पोस्टरवर घडवून टाकले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही ऐक्यासाठी अनुकूलता जरूर दाखवली‌. परंतु, प्रत्यक्षात अजूनही ते एकमेकांशी बोलले देखील नाहीत. पण दोघांचेही समर्थक नेते ऐक्याच्या बाजूने सतत बोलत राहिले. त्यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिक यांचा हुरूप वाढत राहिला. त्यामुळे ते ठाकरे बंधूंचे ऐक्य पोस्टरवर घडवत राहिले.

राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यात राज आणि आदित्य ठाकरे या दोघांनाही एकत्रच वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्टर्स पुण्यात ठिकठिकाणी लागलेली दिसली. ठाकरे बंधूंच्या ऐक्या संदर्भात पत्रकारांनी राज ठाकरेंना प्रश्न विचारला. त्यावर आमच्या ऐक्यापेक्षा मुंबईत येणारे लोंढे थांबविणे आणि महाराष्ट्रातल्या शहरांमधली स्थिती सुधारणे अधिक आवश्यक असल्याचे उत्तर राज ठाकरे यांनी दिले. या उत्तरातून त्यांनी ठाकरे बंधूंच्या ऐक्याच्या प्रश्नाला बगल दिली.

NCP chief ministers on posters and Thackrey brothers unity as same

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात