हाती भोपळे घेऊन आले राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे आमदार; पण भ्रमाचा भोपळा फुटल्याचा मुख्यमंत्र्यांचा नानांना टोला!!

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळात काल शिंदे फडणवीस सरकारने पहिले बजेट सादर केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती भ्रमाचा भोपळा दिल्याचे आरोप करत राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे आमदार हातात लाल भोपळे घेऊन विधिमंडळाच्या दरवाजावर आले, पण मुख्यमंत्र्यांनी मात्र खतासाठी जात या वादळी चर्चेत विरोधकांना घेरताना नाना पटोले यांचा भ्रमाचा भोपळा फुटल्याचा टोला हाणून घेतला. NCP and Thackeray faction agitated with pumpkins, but chief minister eknath shinde pinched nana patole

विधिमंडळात आज शिंदे – फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या आमदारांनी हातात घेतलेले भोपळे आणि ठाकरे गटाने सोलापुरात केलेले फुकट गाजर वाटप आंदोलन हे विषय गाजले. पण त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातला खतासाठी जात विचारल्याचा विषय विरोधकांनी विधिमंडळात लावून धरला.



सरकारला त्यासाठी जोरदार धारेवर धरले. दोन्ही बाजूंच्या आमदारांमध्ये याविषयी थोडी खडाजंगी झाली. हा विषय किरकोळ नाही. खत मागणाऱ्या शेतकऱ्यांना जात विचारणं हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभत नाही, असे टीकास्त्र विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले वगैरे नेत्यांनी सोडले.

मुख्यमंत्र्यांनी खतासाठी जात विचारू नका, अशा सक्त सूचना कृषी विभागाला दिल्याचेही स्पष्ट केले. तसेच संबंधित फॉर्म हा केंद्र सरकारच्या पोर्टलवरचा असल्याने त्यात बदल करण्याच्या सूचना केंद्राकडे करू, असे आश्वासनही दिले. मात्र हे आश्वासन देतानाच मुख्यमंत्र्यांनी काल आमच्या सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्यावर नानांचा भ्रमाचा भोपळा फुटला, असा टोला हाणला.

NCP and Thackeray faction agitated with pumpkins, but chief minister eknath shinde pinched nana patole

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub