क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईल याने २५ कोटींची लाच घेतल्याचा आरोप केल्यानंतर एनसीबीचे दक्षता पथक या प्रकरणात दाखल झाले आहे. प्रभाकरने काही स्वतंत्र साक्षीदार आणि एनसीबी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणातील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या दक्षता पथकाला वानखेडे यांच्या पथकाने २ ऑक्टोबर रोजी मुंबई किनारपट्टीवरील कॉर्डेलिया या क्रूझ जहाजावर टाकलेल्या छाप्यात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. NCB On The Back Foot In The Cruise Drugs Case Vigilance Team Found Many Procedural Lapses In Entire Operation
वृत्तसंस्था
मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईल याने २५ कोटींची लाच घेतल्याचा आरोप केल्यानंतर एनसीबीचे दक्षता पथक या प्रकरणात दाखल झाले आहे. प्रभाकरने काही स्वतंत्र साक्षीदार आणि एनसीबी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणातील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या दक्षता पथकाला वानखेडे यांच्या पथकाने २ ऑक्टोबर रोजी मुंबई किनारपट्टीवरील कॉर्डेलिया या क्रूझ जहाजावर टाकलेल्या छाप्यात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉर्डेलिया प्रकरणात एनसीबीच्या चुकांमुळे खटल्यावर परिणाम होऊ शकतो. एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखालील 7 सदस्यीय तपास पथक लवकरच एनसीबी मुख्यालयाला सविस्तर अहवाल सादर करणार आहे.
दक्षता पथकाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे एक प्रकारे प्रायव्हेट ऑपरेशन (बाहेरील लोकांचे छापे) असल्यासारखी दिसते. या प्रकरणात पंचांना (साक्षीदारांना) ज्या प्रकारे मोकळीक देण्यात आली त्यावर एनसीबीचे अधिकारी खुश नाहीत. या प्रकरणात सहभागी असलेल्या स्वतंत्र साक्षीदारांना देण्यात आलेल्या सूटवरून हे सिद्ध होते की ते एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांना चांगलेच ओळखत होते. तसेच यापूर्वीही अनेक छाप्यांमध्ये सामील होते. नवाब मलिक यांनी या साक्षीदारांची नावे एनसीबीची खासगी फौज म्हणून दिली आहेत. खंडणीच्या खेळात गुंतल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे.
या छाप्यात काही स्वतंत्र साक्षीदारांनी स्वत:ला एनसीबीचे अधिकारी दाखवून शाहरुख खानच्या कर्मचार्यांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचे दक्षता तपासात समोर आले आहे. यामध्ये किरण गोसावी प्रमुख होता. याशिवाय आणखी काही साक्षीदारही दक्षता पथकाच्या रडारवर आहेत.
एनसीबीच्या दक्षता पथकाशी संबंधित अधिकाऱ्यांचे असे मत आहे की, हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले गेले आणि निष्काळजीपणा केला गेला, त्यामुळे क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या तपासावरही परिणाम होईल. या संपूर्ण प्रकरणात छापा टाकल्यानंतर चुकीच्या पद्धतीने सीझर करण्यात आले. एनसीबी अधिकार्यांनी जप्त केलेल्या मालाला बाहेरचे लोक स्पर्श करत होते.
याप्रकरणी एफआयआर लिहिण्यास होणारा विलंबही अनेक प्रश्न निर्माण करतो. साक्षीदारांचे जबाबही चुकीच्या पद्धतीने घेण्यात आले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कोऱ्या कागदावर त्यांच्या सह्या घेतल्याचा आरोप प्रभाकर साईलसह अनेक स्वतंत्र साक्षीदारांनी केला आहे.
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक मेमोही तयार करण्यात आलेला नाही. छाप्याच्या वेळेपासून क्रूझ लाइनरवर काय घडले याचा तपशीलही बरोबर नोंदवला गेला नाही. छाप्यादरम्यान प्रत्यक्षात काय घडले, आरोपीला कधी आणि कसे ताब्यात घेण्यात आले, याचा तपशील स्वतंत्र साक्षीदारांच्या जबाबात भिन्न आहे. NCB अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “जर खटल्यादरम्यान अशा त्रुटी न्यायालयात गेल्या तर त्याचा खटल्यावर परिणाम होऊ शकतो.”
मंगळवार व गुरुवारी स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साइलची तपासणी करण्यात आली. दक्षता पथकाने 16 तासांहून अधिक काळ त्याचा जबाब नोंदवला आहे. प्रभाकर यांचे म्हणणे कॅमेऱ्यात घेण्यात येत आहे. या प्रकरणी त्यांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे. याच प्रकरणी दक्षता पथकाने शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांनाही चौकशीसाठी बोलावले आहे, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या चौकशी टाळत आहेत. एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह म्हणाले की, या प्रकरणातील मुख्य आरोपी किरण गोसावी याची चौकशी करण्यासाठी ते लवकरच न्यायालयाची परवानगी घेणार आहेत. सध्या तो पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. 2018च्या फसवणूक प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App