नवाब मलिक आणि भाजपा नेते मोहित कंबोज हे आमने-सामने आले आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली आहे. Nawab Malik’s allegations against Mohit Kamboj; Kamboj answered ‘yes’
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई ड्र्ग्स प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात केलेल्या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणामध्ये नवाब मलिक आणि भाजपा नेते मोहित कंबोज हे आमने-सामने आले आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली आहे.
दरम्यान, आर्यन खानचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आणि त्यामध्ये मोहित कंबोज हे मास्टरमाईंड होते, असा आरोप मलिक यांनी केला होता.यावर कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. तसंच नवाब मलिक यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल कऱणार असल्याचंही कंबोज यांनी म्हटलं.
सुनिल पाटील आणि सॅम डिसूझाचे काय संबंध हे त्यांनी सांगावे, मलिक सत्य लपवत असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी यावेळी केला आहे. सुनिल पाटीलशी राष्ट्रवादीशी काय संबंध हे त्यांनी सांगावे.आरोप करणाऱ्या मलिकांविरोधात मी हायकोर्टात खटला दाखल करणार असे देखील कंबोज यांनी सांगितले आहे.
मलिक यांच्या आरोपांचे स्वागत, त्यांनी सिद्ध करून, दाखवावे मी त्यांच्या आरोपांचे स्वागत करतो. त्यांनी जे खोटे आरोप माझ्यावर केले आहेत. त्याविरोधात मी न्यायालयात जाणार आहे. त्यांच्याच भाषेत उत्तर देईन, असा इशारा कंबोज यांनी यावेळी दिला आहे.
ललित हॉटेलचा उल्लेख करत हेड मी होतो असा त्यांचा आरोप, पण त्यांनी जे आरोप केले ते खोटे आहेत. अनिल देशमुखांच्या ईडी चौकशीत सुनिल पाटीलचे नाव आहे. त्याने घर का सोडलं, कुलूप लावून तो कुठे गेला? असा प्रश्न विचारला. मी कधी ललित हॉटेलमध्ये पाच वर्षात गेलो असेल तर सीसीटीव्ही चेक करा असही कंबोज म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App