Nawab Malik vs Fadanvis:नवाब मलिकांनी घेतली आर्यनची बाजु तर फडणवीस म्हणतात…NCB म्हटलं की नवाब मलिक यांच्या पोटात का दुखतं सगळ्यांना माहित आहे …

विशेष प्रतिनिधी

मुंबई:राष्ट्रवादीकडून सातत्याने drugs प्रकरणात आर्यनची बाजु घेतली. त्यावर NCB म्हटलं की नवाब मलिक यांच्या पोटात का दुखतं हे सगळ्यांना माहित आहे. मी त्यावर काही वेगळी प्रतिक्रिया देऊन नवाब मलिक यांच्या जखमेवरची खपली काढणार नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांवर खोचक टोला लगावला आहे.Nawab Malik vs Fadnavis : why Malik is afraid of NCB everyone knows …said Fadnavis

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन NCB वर निशाणा साधला, तसंच भाजपवरही आरोप केले. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी नवाब मलिक यांना टोला लगावला आहे.

नवाब मलिक यांनी NCB आणि भाजपवर नेमके काय आरोप केले आहेत?

‘राजीव गांधी यांच्या इच्छाशक्तीमुळे NDPS कायदा देशात लागू झाला. देश ड्रग्समुक्त व्हावा यासाठी NCB ची स्थापना करण्यात आली. यावेळी राज्यांसह केंद्रीय एजन्सीला देखील तपासाचे अधिकार देण्यात आले. गेल्या 36 वर्षापासून आतापर्यंत या तपास संस्थेने अनेक रॅकेट उघडकीस आणले आहेत. गेल्या 36 वर्षापर्यंत या एजन्सीच्या तपासावर कधीही शंका घेण्यात आली नाही. पण आता मात्र, NCB च्या तपास यंत्रणेवर सवाल उपस्थित केले जात आहेत.’

‘सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण हे हत्या प्रकरण दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी असं चित्र निर्माण करण्यात आलं की, ड्रग्ससाठी त्याची हत्या झाली. तेव्हापासून NCB चं झोनल ऑफिस लाइमलाइटमध्ये आलं.

त्यानंतर त्या प्रकरणात बातम्या प्लांट करण्यात आल्या आणि बॉलिवूडचं नाव खराब करण्यात आलं. अनेक कलाकारांना समन्स देऊन चौकशीसाठी बोलावण्यात आलं.’ असं नवाब मलिक म्हणाले.

‘हे संपूर्ण प्रकरणच बनावट आहे’

‘जेव्हा हे सगळं शनिवार आणि रविवारी सुरु होतं तेव्हा एनसीबीने काही फोटो चॅनलच्या प्रतिनिधींना पाठवले. ज्यामध्ये चरस, कोकेन आहे असं सांगण्यात आलं. या गोष्टी आम्ही क्रूझवर जप्त केल्याचं देखील त्यांनी सांगितलं. पण NDPS कायद्यात जप्तीची एक प्रक्रिया आहे. हे जे फोटो आहेत ते कोणत्याही क्रूझवरील नाहीत. हे फोटो झोनल डायरेक्टरच्या ऑफिसमधील आहे. त्याचा एक व्हीडिओ मी तुम्हाला दाखवतो.’

‘जेव्हा ड्रग्स प्रकरणात छापेमारी होते तेव्हा जप्त केलेल्या वस्तूंचा पंचनामा केला जातो. हा सगळा जप्तीचा माल कोणासमोरही उघडता येत नाही. फक्त कोर्टात मॅजिस्ट्रेटच्या समोर ते उघडलं जातं आणि तात्काळ सील केलं जातं. त्यामुळे हे व्हिडीओ, फोटो यातून हेच दिसतं की, या वस्तू क्रूझवर सापडलेल्या नाही. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरणच बनावट आहे.’ असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

Nawab Malik vs Fadnavis : why Malik is afraid of NCB everyone knows …said Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात