नवाब मलिकांनी घडवली अजितदादा आणि शरद पवार एकत्र येण्याची चर्चा; जयंत पाटील + सुप्रिया सुळेंनी फेटाळली शक्यता!!

Ajitdada

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी घडवली अजितदादा आणि शरद पवार एकत्र येण्याची चर्चा, पण जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी फेटाळली शक्यता!! राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गोटांमध्ये असे बरेच काही घडते आहे.Nawab Malik made Ajitdada and Sharad Pawar come together; Jayant Patil + Supriya Sule rejected the possibility!!

भाजपचा विरोध डावलून अजित पवारांनी नवाब मलिकांना शिवाजीनगर मानखुर्द मधून तिकीट दिले. भाजप विरोधातली आपली भडास काढण्यासाठी नवाब मलिकांनी नव्या चर्चेला हवा दिली. निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात काहीही होऊ शकते. कदाचित शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकमेकांच्या संपर्कात राहून एकत्र येऊ शकतात तसेच अजितदादा आणि शरद पवार देखील एकत्र येऊ शकतात, असे नवाब मलिक एका मुलाखतीत म्हणाले. त्यामुळे मराठी माध्यमांनी निवडणुकीनंतरच्या समीकरणांना हवा दिली.



परंतु अखंड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या दोघांशी अजितदादांचा राजकीय संघर्ष होता आणि अजितदादा बाहेर पडल्यामुळे ज्यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सर्वाधिक फायदा झाला, त्या जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी मात्र शरद पवार आणि अजितदादा एकत्र येण्याची शक्यता फेटाळून लावली.

अजितदादा दूर गेलेत

अजित पवार आमच्या पासून आता मूळातच खूप दूर गेले आहेत. त्यांनी महायुतीचे सरकार पुन्हा आणायचे प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे आमच्या पक्षात तरी अजितदादा परत येण्याची चर्चा देखील नाही, अशा शब्दांमध्ये जयंत पाटलांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत अजितदादा आणि शरद पवारांच्या एकत्रित करण्याची शक्यता फेटाळून लावली.

अजितदादांनी खंजीर खुपसला

सुप्रिया सुळे यांनी त्या पलीकडे जाऊन अजितदादा आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या सगळ्या आमदारांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला. अजित पवारांनी शरद पवारांना 30 जून 2023 रोजीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून काढून टाकले. 2 जुलैला त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु शरद पवारांना राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून काढून टाकल्याची माहिती कोणालाच दिली नाही. ती लपवून ठेवली. वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा तशा बातम्या आल्या नाहीत, पण सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या सगळ्या कागदपत्रांमध्ये अजितदादांच्या सहीसह हे सगळे लिहिले आहे. ते ऑन रेकॉर्ड आले आहे, अशा शब्दांमध्ये सुप्रिया सुळे यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांविरुद्ध संताप व्यक्त केला.

Nawab Malik made Ajitdada and Sharad Pawar come together; Jayant Patil + Supriya Sule rejected the possibility!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात