नवाब मलिक यांनी दिवाळीपूर्वी लवंगी फटाका फोडलाय, मी दिवाळीनंतर मी बाँब फोडेन : देवेंद्र फडणवीस यांचा इशारा


वृत्तसंस्था

मुंबई : नवाब मलिक यांनी दिवाळीपूर्वी लवंगी फटाका फोडलाय, मी दिवाळीनंतर मी बाँब फोडेन, असा खणखणीत इशारा भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. Nawab Malik fires small cracker before Diwali, I will blow up bombs after Diwali: Devendra Fadnavis warns

फडणवीस म्हणाले, दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. मलिकांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला याच्या पाठीमागची मानसिकता दिसत आहे. रिव्हर मार्चने स्पष्ट केले आहे की तो भाड्यानं आणलेला माणूस आहे. त्यामुळे त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

जो फोटो त्यांनी ट्विट केला आहे तो चार वर्षांपूर्वीचा आहे. रिव्हर मार्चच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केल्यानंतर आम्ही त्या मोहिमेशी जोडले गेलो होतो. मी त्यांना मदत करत होतो. त्या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी हे फोटो काढण्यात आले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ड्रग विक्रेत्यांचे भाजपा नेत्याशी संबंध आहेत,असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत केला. देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर संपूर्ण महाराष्ट्रात अमली पदार्थांचा व्यापार सुरू आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्वतः समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांची भेट का घेतली, असा सवाल मलिक यांनी केला. आरोपींना पाठिंबा देणे दुर्दैवी असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी हा इशारा दिला आहे.

Nawab Malik fires small cracker before Diwali, I will blow up bombs after Diwali: Devendra Fadnavis warns

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*