प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांची गेल्या 7 तासांपासून सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या मुंबई कार्यालयात चौकशी सुरू आहे. कुख्यात तस्कर आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांचा हात असल्याचा संशय आहे. दाउदचा भाऊ इक्बाल कासकरने नवाब मलिक यांचे नाव ईडी चौकशी घेतल्याने मालिकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. Nawab malik ED inquiries anil deshmukh chandrakant patil ncp
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. नवाब मलिक हे केंद्रीय तपास यंत्रणांनी विरुद्ध आणि केंद्र सरकार विरुद्ध परखड मते मांडतात म्हणून तसेच ते मुस्लीम असल्याने त्यांच्या त्यांचे नाव दाऊदशी जोडतात, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला आहे.
भुजबळ, देशमुखांच्या अटकेच्या वेळी मोर्चे नाहीत, फक्त नवाब मलिकांच्या ईडी चौकशीच्या वेळी राष्ट्रवादीचे मोर्चे!!; रहस्य काय??
या मुद्द्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया केंद्र सरकारच्या सूड बुद्धीवर असणे स्वाभाविक आहे. अनिल देशमुख यांना ईडीने ताब्यात घेतल्यावर त्यांची सुरुवातीला हीच प्रतिक्रिया होती. परंतु त्यांना अटक झाल्यानंतर आज त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस दुर्लक्ष करते आहे. मी तोंड उघडले तर अनेकांची पंचाईत होईल, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतले नेतेही हादरले आहेत. नवाब मलिक यांच्या बाबतीतही तसेच घडेल पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तसे नवाब मलिक यांना यांच्या बाबतीत घडू देऊ नये. अनिल देशमुख यांना जसे बाजूला टाकून दिले, असे नवाब मलिक यांना बाजूला टाकू नका, असा टोला चंद्रकांत दादा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला लगावला आहे.
छगन भुजबळ यांना अटक झाली आणि ते दोन वर्ष तुरुंगात होते तेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांनाही वाऱ्यावर सोडले होते याची आठवण चंद्रकांत दादा यांनी या वेळी करून दिली.
शरद पवार यांचे राजकारण नेहमी समाजात फूट पाडणारे राहिले आहे. कधी ते मराठा-मराठेतर फुट पाडतात, तर कधी हिंदू-मुस्लीम फुट पाडतात. गेल्या 50 वर्षांच्या राजकारणाचा त्यांचा हा इतिहास आहे, असा टोलाही चंद्रकांत दादांनी या पत्रकार परिषदेत शरद पवारांना लगावला आहे.
महाराष्ट्रातल्या महा विकास आघाडी सरकारला केंद्रातले भाजप सरकार अन्याय करते असे वाटत असेल तर त्यांनी न्यायालयात जावे. पण गेल्या 27 महिन्यांमध्ये ते प्रत्येक केस न्यायालयात हरले आहेत. ओबीसी आरक्षणाची केस ते मुद्दामून लांबवत चालले आहेत, असा आरोपही चंद्रकांत दादांनी यावेळी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App