विशेष प्रतिनिधी
अमरावती : Navneet Rana अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचा खरपूस समाचार घेतला आहे. राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे केवळ सत्ता व खुर्चीसाठीच एकत्र आलेत. ठाकरे परिवार हे मजबुरीचे दुसरे नाव झाले आहे, असे त्या म्हणाल्यात. यावेळी त्यांनी आमदारांना कथितपणे मारून टाकण्याची भाषा करणाऱ्या माजी आमदार बच्चू कडू यांच्यावरही निशाणा साधला.Navneet Rana
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बंधू बऱ्याच वर्षांच्या अबोल्यानंतर आता एकत्र आलेत. त्यांच्या युतीची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चर्चा सुरू आहे. पण त्यावर टीकाही होत आहे. भाजपने यापूर्वीच ठाकरे बंधूंच्या युतीचा राज्याच्या राजकारणावर कोणताही परिणाम पडणार नसल्याचा दावा करत त्यांच्या युतीची खिल्ली उडवली आहे. त्यानंतर आता अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी राज व उद्धव ठाकरे हे पैसा अन् तोड्या करण्यासाठीच एकत्र आल्याचा दावा केला आहे.Navneet Rana
पैसा व तोड्या करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र
नवनीत राणा यांनी मंगळवारी आपल्या निवासस्थानी अंध, अपंग व कुष्ठरोगी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच राणा दाम्पत्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी नवनीत राणा यांनी ठाकरे बंधू तथा प्रहार संघटनेचे माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, कुटुंब एकत्र येणे ही आपली संस्कृती आहे. आपण ती जपली पाहिजे. आज संपूर्ण महाराष्ट्र दोन भाऊ एकत्र आल्याचे पाहत आहे. पण ते कुटुंबासाठी नाही तर फक्त सत्ता व खुर्चीसाठी एकत्र आलेत. फक्त पैसा व तोड्या करण्यासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र आलेत. ठाकरे परिवार हे मजबुरीचे दुसरे नाव झाले आहे.
बच्चू कडूंनी आपल्या खिशात हात टाकलाच नाही
नवनीत राणा यावेळी बच्चू कडूंवर निशाणा साधताना म्हणाल्या, सध्या बरेच लोक नौटंकी करत आहेत. बाहेर फिरून आमदारांना मारून टाका असे सांगत आहेत. पण तुम्ही चारवेळा आमदार होता. दोनवेळा मंत्री राहिला. तेव्हा शेतकऱ्यांसाठी तुमची पोटदुखी बाहेर आली नाही. आज अनेक लोक आजीचे माजी झालेत. कारण, त्यांनी कधीच आपल्या खिशात हात टाकला नाही. फक्त इनकमिंग. आऊटगोइंग नाही. अचलपूरच्या माजी आमदारांकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. मी त्यांना दहावेळा म्हणाले की, तुमची संपत्ती मला द्या, माझी संपत्ती तु्म्ही घ्या. आता त्यांना एका शेतकऱ्याच्या मुलाने पाडले आहे, असे त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App