केंद्राने केले आता तुम्हीही करा, इंधनावरील १२ रुपये नफा कमी करून सवलत द्या, नवनीत राणा यांची मागणी


विशेष प्रतिनिधी

नागपूर :केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करून जनतेला भेट दिली आहे. अनेक भाजप शासित राज्यांनीही कर कमी केल्याने त्या राज्यातील दर कमी झाले आहेत.मात्र महाराष्ट्रातील आघाडी सरकारने अद्याप निर्णय घेतला नसल्याने खासदार नवनीत राणा यांनी टीका केली आहे.Navneet Rana demands reduction of Rs 12 per liter profit on fuel

खासदार नवनीत राणा म्हणाल्या, सरकारने या दिवाळीनिमित्त संपूर्ण देशासह महाराष्ट्राला दिवाळी भेट म्हणून पेट्रोल आणि डिझेलवर सूट दिली आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे संजय राऊत बोलतात पाच आणि दहा रुपयांनी काय होते. केंद्र सरकारने दर कमी करुन महाराष्ट्राला भेट दिली आहे.तर आपण महाराष्ट्र सरकारला सांगावे की दिवाळी भेट म्हणून इंधनावरुन कर आकारल्यानंतर येणारा जो १२ रुपये नफा आहे तो कमी करुन सवलत द्यायला पाहिजे. संजय राऊत आपण केंद्रावर प्रत्येक गोष्टीवरुन टीका करता पण आपल्या महाराष्ट्रात एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत. दिवाळीच्या दिवशी आंदोलन करत आहेत. त्यांची मागणी आपण का पूर्ण करत नाही.

केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोलवरील कर पाच रूपयांनी तर डिझेल वरील कर दहा रुपयाने कमी केला आहे. अनेक भाजप शासित राज्यांनीही कर कमी केल्याने जनतेला दुहेरी फायदा झाला आहे. मात्र महाराष्ट्रातील ठाकरे सरकार याबाबत निर्णय घ्यायला तयार नाही. त्यावरून नवनीत राणा यांनी टीका केली आहे.

Navneet Rana demands reduction of Rs 12 per liter profit on fuel

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात