Navi Mumbai International Airport नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मल्टी-मॉडेल कनेक्टिव्हिटी’

विशेषतः या विमानतळावर वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Navi Mumbai International Airport

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘नवी मुंबईतील सिडकोच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांबाबत’ आढावा बैठक संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ‘मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी’ तयार करण्याचे निर्देश दिले.

यामध्ये जलमार्ग, मेट्रो, रस्ते मार्गांचा समावेश असेल, ज्यामुळे प्रवाशांना विविध पर्याय उपलब्ध होतील. विशेषतः या विमानतळावर वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ही सेवा असणारे देशातील हे पहिले आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सामान्य विमान वाहतुकीच्या सुविधा, विमान पार्किंग आणि दुरुस्तीची व्यवस्था तत्काळ विकसित करण्यात यावी. तसेच रस्ते, मेट्रो, रेल्वे आणि जलवाहतूक मार्गांची कामे वेळेत पूर्ण करावीत. नैना प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या व नियोजित रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी भविष्यातील वाहतुकीचा अंदाज घेऊन नियोजन करावे. सर्व पायाभूत सुविधांच्या कामांसाठी निश्चित कालमर्यादा ठेवावी आणि कोणतेही काम विलंबाने होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

विमानतळाशी जोडणाऱ्या मेट्रो स्टेशनपासून नागरिकांसाठी सुलभ वाहतुकीचे नियोजन करावे, तसेच घरकुल प्रकल्प दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करून परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करावीत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या क्रीडा सुविधा प्रकल्पांचा उल्लेख करत, खारघर व्हॅली गोल्फ कोर्सचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. या बैठकीला राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Navi Mumbai International Airport to get multi modal connectivity

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात