विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे येथील नवले पुलावर दोन ते तीन वाहनांनी पेट घेतल्याची एक भीषण अपघात घटना घडली आहे, ज्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाल्याचे समजते. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, तसेच अग्निशमन दलाच्या गाड्याही नवले पुलावर तातडीने पोहोचल्या. अपघातातील सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. Navale Bridge Accident
या अपघातात मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहिर केली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले, पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातात काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल. Navale Bridge Accident
साताऱ्याच्या दिशेने पुण्याकडे येणाऱ्या दोन्ही ट्रकचा अपघात झाला आणि यात एक कार अडकली होती. यावेळी दोन्ही ट्रकला आग लागली असून यात मृतांची संख्या देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या अपघातामुळे नवले ब्रिजवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अग्निशमन दलाकडून ट्रकला लागलेल्या आग विझवण्याचे प्रयत्न करत असून यावेळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नवले पुलावर अनेक अपघात होत असतात, परंतु हा अपघात सर्वात मोठा असल्याचे बोलले जात आहे. दोन ट्रकचा अपघात झाला असून यात मागच्या ट्रकचा चालक अद्यापही ट्रकमध्येच अडकला असल्याचे दिसून येत आहे. तर सध्या या अपघातात अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. चारचाकी जी या दोन्ही ट्रकच्या मध्ये अडकली होती, या कारमधील प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
कारमधील मयतांची नावे
१. मोक्षिता रेड्डी (वय ३) २. स्वाती नवलकर ३. शांता दाभाडे (स्वाती नवलकर यांची आई ) ४. दत्तात्रय दाभाडे (वडील ) ५. धनंजय कोळी (चालक)
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका कंटेनरचा ब्रेक फेल झालेला होता आणि त्या कंटेनरने पुढच्या ट्रकला धडक दिली. मध्ये एक कार होती, त्यात 4-5 लोक होती, ती संपूर्णपणे जळून खाक झाली आहेत. ट्रक चालक देखील ट्रकमध्येच अडकले असून त्यांना देखील आगीमुळे उतरता आले नाही. त्यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. तसेच मागे एक ट्रॅव्हलर होती, त्याला सुद्धा धडक देण्यात आली, त्यात 17-18 लोक होती. जवळपास 20-25 लोक जखमी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला होता, त्या ट्रकने 20-25 वाहनांना धडक दिली आहे. पंचनामा सुरू असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App