विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रख्यात अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी मुघलांची राष्ट्रनिर्माते म्हणून तरफदारी केली तर मोदी सरकारच्या काळात मुस्लिमांवर अन्याय अत्याचार होत असल्याची निंदा केली. नसरुद्दीन शहा यांची ही वक्तव्य पाकिस्तानी मीडियाने उचलून भारतात मुस्लिमांवर कसे अत्याचार होत आहेत याचा प्रपोगंडा सुरू केला आहे. Nasruddin Shah’s support for Mughals, condemnation of Modi government picked up by Pakistani media !!
नसरुद्दीन शहा यांनी करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. मुघल हे राष्ट्रनिर्माते होते. त्यांनी भारताच्या साहित्य, संस्कृती, कला आणि वास्तुशास्त्र यामध्ये भर घातली. मुघल इथे शरणार्थी म्हणून आले होते, असे नसरुद्दीन शहा म्हणाले. त्याच वेळी गेल्या काही वर्षांपासून मुस्लिमांना भारतात दुय्यम नागरिक म्हणून वागवले जात आहे. भारतात इथून पुढे जन्माला येणार यांचे भवितव्य काय असेल हे माहिती नाही. मशिदी, चर्चेस पाडली जात आहेत, अशा स्वरूपाची मुक्ताफळे देखील नसरुद्दीन शहा यांनी उधळली आहेत.
Violence Against Muslims and Christians. Bollywood Star Naseeruddin Shah… https://t.co/7XclbyZwcy via @YouTube — Abdul Basit (@abasitpak1) December 29, 2021
Violence Against Muslims and Christians. Bollywood Star Naseeruddin Shah… https://t.co/7XclbyZwcy via @YouTube
— Abdul Basit (@abasitpak1) December 29, 2021
नेमके हेच मुद्दे पाकिस्तान टीव्ही, पाकिस्तान रेडिओ यांनी उचलले असून त्यांनी ट्विट करत पहा, भारतातलेच प्रख्यात अभिनेते नसरुद्दीन शहा म्हणताहेत की भारतामध्ये मुसलमानांचे शिरकाण सुरू आहे, असा आरोप केला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बसित यांनी देखील नसरुद्दीन शहा यांची मुलाखत ट्विट केली असून भारतात मोदी सरकार आल्यापासून मुस्लिमांवरचे हल्ले वाढले आहेत, असा आरोप केला आहे.
करण थापर आणि नसरुद्दीन शहा हे लिबरल विचारवंत मानले जातात. करण थापर यांनी नसरुद्दीन शहा यांची घेतलेली मुलाखत पाकिस्तानी मीडियाला आवडली आहे आणि त्यांनी त्या मुलाखतीतले धागेदोरे उचलून भारताविरुद्ध जोरदार प्रचार चालवलेला दिसत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App