विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिकच्या काठी गल्ली परिसरातला अनधिकृत सातपीर दर्गा हटवायला विरोध करणाऱ्या जमावाने ताल मध्यरात्रीनंतर पोलिसांवर प्रचंड दगडफेक केली. त्यामध्ये ११ पोलीस जखमी झाले, पण नंतर मात्र पोलिसांनी कठोर कारवाई करत जमावाला आटोक्यात आणले आणि रातोरात तो अनधिकृत दर्गा हटवलाच. काटे गल्ली परिसरातील सातपीर अनधिकृत दर्गा हटवण्यासाठी महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी संबंधितांना पंधरा दिवसांची मुदत दिली होती पण त्यांनी तो अनधिकृत दर्गा हटवला नाही उलट जमावाने पोलिसांवरच दगडफेक केली त्यानंतर पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई करून अनधिकृत सातपीर दर्गा हटवला.
मुस्लिम धर्मगुरू आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थिती संयुक्तपणे मध्यरात्रीच्या सुमारास कारवाईला सुरवात केली. प्रशासनाच्या कारवाईबाबतीत चर्चा सुरू झाल्यानंतर संतप्त जमाव काठे गल्लीच्या दिशेने आला. जमावाने पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि पोलीस वाहनांच्या दिशेने दगडफेक सुरू केली यात चार अधिकारी आणि सुमारे 11 पोलीस कर्मचारी जखमी झाले. यानंतर जमावाला पंगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. काही जणांना ताब्यात घेतले. पहाटेपर्यंत काम करून पोलिसांनी तो दर्गा हटवला.
आता सकाळ पासून काठे गल्ली परिसरात पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली असून तणावपूर्ण शांतता आहे. मध्यरात्री पोलिसांनी बळाचा वापर केल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.
काठे गल्ली परिसरात अनधिकृत दर्गा हटविण्याची गेल्या अनेक वर्षाची मागणी होती. गेल्या महिन्यात हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने आंदोलन ही करण्यात आले होते. वक्फ बोर्ड आणि उच्च न्यायालयात यासंदर्भात सुनवणी झाली. उच्च न्यायालयात दर्गा ट्रस्टला दर्गा बाबतीत काही पुरावे सादर करता आले नसल्याने मनपाने दर्गा अनधिकृत ठरवून 15 दिवसाच्या आता अनधिकृत दर्गा काढण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर मध्यरात्रीपासूनच कारवाई सुरू करण्यात आली आहे. सध्या परिसरात शांतता असून या मार्गावरील वाहतूक पुढील तीन दिवस बंद ठेवण्यात आली असून बंदोबस्त कायम राहणार आहे.
नेमकं काय घडलं?
नाशिक पोलिसांनी 15 दिवसांपूर्वी सातपीर दर्ग्याचे बांधकाम हटवण्याची नोटीस दिली होती. मात्र, कालपर्यंत दर्ग्याचे बांधकाम हटवण्यात आले नाही. त्यामुळे पोलिसांनी आणि महानगरपालिकेने कारवाई केली. प्रत्यक्ष कारवाई बुधवारी पहाटे साडेपाचला सुरु झाली. तत्पूर्वी काल रात्री दर्ग्यातील धर्मगुरु आणि प्रशासनाने मिळून धार्मिक प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजता अनधिकृत बांधकामाच्या तोडकामाला सुरुवात झाली. त्यापूर्वी दर्गा परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, रात्री दीड ते दोन वाजता याठिकाणी आलेल्या जमावाने अचानक पोलिसांवर तुफान दगडफेक सुरु केली. यामध्ये अनेक पोलिसांच्या हात-पायाला जखमा झाल्या आहेत.
परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले. आज सकाळपासून येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. हा परिसर पूर्णपणे निर्मनुष्य करण्यात आला आहे. तसेच काठेगल्ली या भागातील वाहतूक इतरत्र वळवण्यात आली आहे. काठे गल्ली ते भाभा नगरच्या दिशेने जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App