Nashik National Archer : नाशिकच्या राष्ट्रीय तिरंदाजाचा करुण अंत, राजस्थानच्या कोटा स्थानकावर रेल्वेतून पडून मृत्यू

Nashik National Archer

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Nashik National Archer नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील राष्ट्रीय तिरंदाज अर्जुन सोनवणेचा राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकावर अपघाती मृत्यू झाला. तो सहकाऱ्यांसह भटिंडाहून शकुरबस्ती- मुंबई सेंट्रल एसी स्पेशल ट्रेनने घरी परतत होता. कोटा रेल्वे स्थानकावर जेवणाचे पॅकेट घेण्यासाठी तो उतरत होता. चालत्या ट्रेनमधून उतरण्याची चूक त्याने केली आणि तो पडला. प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये सापडून अडकल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले परंतु, त्याचा मृत्यू झाला.Nashik National Archer

२० वर्षीय अर्जुन सहकाऱ्यांसोबत खेळण्यासाठी भटिंडा येथे गेला होता. ते तिथून परतत होते. शनिवारी रात्री ८:३० वाजता कोटा जंक्शनवर आल्यानंतर ही अपघाताची दुर्देवी घटना घडली. अपघातानंतर त्याचे साथीदार घाबरले. असा अपघात होऊ शकतो याची कोणालाही कल्पना नव्हती. त्याला ताबडतोब एमबीएस रुग्णालयात नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. त्याच्या कुटुंबाला माहिती देण्यात आली. रविवारी त्याचे मामा आणि मावशीचा मुलगा कोटा येथे पोहचले. शवविच्छेदनानंतर, मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला.Nashik National Archer



भाऊबीजेला नव्हता घरी

मागील दहा दिवसांपासून अर्जुन हा गुरु काशी विद्यापीठ पंजाब येथे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तिरंदाजी स्पर्धेसाठी त्याची चुलत बहीण दीक्षासोबत गेला होता.

गेल्यावर्षी लिगामेंट शस्त्रक्रिया, तेथेच अपघातात दुखापत

अर्जुनचे गेल्या वर्षी उजव्या पायाचे लिगामेंटचे ऑपरेशन झाले होते. परंतु, दुर्दैवाने या अपघातात त्याच पायाला दुखापत झाली

आठ सुवर्णपदके नावावर, चौघे भाऊ-बहीण तिरंदाज

अर्जुन पदवीचे शिक्षण घेत होता. पाच वर्षांपासून चौघे बहिण- भाऊ तिरंदाजीचा सराव करत होते. तो आठ वेळा राष्ट्रीय पातळीवर खेळला आणि राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आठ वेळा सुवर्णपदके जिंकली होती.

Nashik National Archer Died Falling Train Kota Station

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात