Ashok Kharat : महिलांना संमोहित करून भोंदू खरात करायचा लैंगिक शोषण, चाकणकरांसह 11 ट्रस्टींना एसआयटीचे समन्स

Ashok Kharat

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Ashok Kharat  धार्मिक श्रद्धेचा बाजार मांडून महिलांचे लैंगिक शोषण करणारा आणि कोट्यवधींची माया जमवणारा नराधम अशोक खरात महिलांना गुंगीकारक पेढा आणि कडवट पाणी देऊन संमोहित करायचा आणि नंतर अत्याचार करायचा, असा खळबळजनक आरोप रविवारी (दि. २९) नाशिक जिल्हा न्यायालयात सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. खरातच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला हजर केले असता, अतिरिक्त मुख्य सत्र न्यायाधीश श्रीमती बराडे यांनी त्याला १ एप्रिलपर्यंत पुन्हा पोलिस कोठडी सुनावली आहे.Ashok Kharat

दरम्यान, एसआयटीने राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह ईशानेश्वर मंदिर ट्रस्टच्या ११ विश्वस्तांना (ट्रस्टी) चौकशीसाठी समन्स बजावले आहे. यासोबतच ट्रस्टच्या नावाखाली चालणाऱ्या बेकायदा आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी तसेच ट्रस्टच्या निर्णय प्रक्रियेत विश्वस्तांची भूमिका आणि आर्थिक फसवणुकीतील त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी एसआयटीने हा समन्स बजावला आहे.Ashok Kharat



खरातची कोठडी तपासकार्यासाठी आवश्यक असल्याची बाब न्यायालयाला पटवून देण्यात सरकारी वकिलांना यश आले. त्याविरोधात खरातच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद न्यायालयासमोर निष्प्रभ ठरला. त्यामुळे न्यायालयाने खरातच्या ३ दिवसांची कोठडी देण्याला मंजुरी दिली. यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ एम. वाय. काळे यांनी पीडितेची बाजू मांडताना सांगितले की, खरातने केवळ शारीरिक शोषण केले नाही, तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. दैवी शक्तीचा खोटा दावा करून आणि रसायने पाजून महिलांच्या बुद्धीचा ताबा घेणाऱ्या या समाजविघातक माणसाला कोठडी मिळालीच पाहिजे. यासोबतच या प्रकरणी हाती लागलेल्या माहितीचा आणखी खोल तपास करण्यासाठीही तपास संस्थेने अधिक कालावधी आवश्यक असल्याचे न्यायालयात सांगितले. उल्लेखनीय बाब म्हणजे, १८ मार्च रोजी अटक केलेल्या खरातला न्यायालयाने पहिल्यांदा ७ दिवसांची, नंतर ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. ती रविवारी संपुष्टात येत असल्याने न्यायालाने त्याला पुन्हा ३ दिवसांची कोठडी सुनावणी आहे.

मोबाईल, संगणकातील डाटा रिकव्हरीने ठरणार तपासाची दिशा :

डिजिटल फॉरेन्सिक: आरोपीने मोबाईल आणि संगणकातील हार्ड डिस्कमधील डाटा डिलीट केला आहे. आता तज्ज्ञांमार्फत चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि डिलीट केलेले व्हिडिओ परत मिळवणे हा तपासाचा मुख्य भाग असेल.

डमी नावांचा उलगडा: मोबाईलमध्ये कोड नेममध्ये सेव्ह असलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जाईल. यात काही राजकीय नेते मंडळी असण्याचा संशय असून त्यांची खरातशी असलेली लिंक ओपन होऊ शकते.

खरातने हवालामार्फत १०० कोटी दुबईला धाडल्याचा संशय

खरातने या ट्रस्टच्या माध्यमातून १०० कोटी रुपये हवालाद्वारे दुबईला पाठवल्याचे उघड झाले असून, एकूण ३०० कोटींचा व्यवहार एका सीएच्या मदतीने केल्याचा संशय आहे. यादरम्यान, अटकेच्या भीतीने संबंधित सीए खरातविरुद्ध साक्ष देण्याची शक्यता आहे. त्याच्या चौैकशीतूनही ट्रस्टचे आर्थिक गैरव्यवहार उघड होण्याची शक्यता दाटली आहे.

Nashik Godman Ashok Kharat Case: SIT Summons Rupali Chakankar & 11 Trustees

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात