विशेष प्रतिनिधी
मुंबई :Narhari Jirwalराष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पुन्हा एकदा त्यांची शरद पवार यांच्यावर असलेली निष्ठा व्यक्त करून दाखवली आहे. बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसतील. तर माझ्या छातीत तुम्हाला शरद पवार साहेबच दिसतील, असे म्हणत पुढे झिरवळ म्हणाले, आता शरद पवार यांच्यासमोर जाऊन लोटांगण घालून पाया पडणार आहे, असे विधान नरहरी झिरवाळ यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.Narhari Jirwal
नरहरी झिरवाळ म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री यांनी पवार कुटुंब पुन्हा एकत्र आले पाहिजे, असे साकडे पांडुरंगाला घातले आहे. यावर नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नरहरी झिरवाळ म्हणाले, माझी एकच मागणी आहे. प्रत्येक माणूस तीच मागणी करतोय, विरोधक असो की राष्ट्रवादीचा कोणीही माणूस असो, सगळ्यांना वाटत आहे की अजितदादा आणि शरद पवार साहेब यांनी एकत्र आले पाहिजे. राजकारणात काही गोष्टी घडून गेल्या आहेत. आम्ही पवार साहेबांना सोडून गेलो. मात्र लोकांनी आम्हाला निवडून दिले, असे नरहरी झिरवाळ म्हणाले आहेत.
नरहरी झिरवाळ म्हणाले, दोन्ही पवार एकत्र आले पाहिजे ही पांडुरंगाला विनंती करतो. मी पाडुंरंगाच्या शेजारी पवारसाहेबांना पाहतो. साहेब निश्चित विचार करतील. राजकारणात त्याचा वापरही केला गेला. पहाटे शपथ झाली तेव्हा मी दिल्लीला पळून गेल्याची माझ्यावर टीका झाली. बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसले होते. माझी छाती फाडली तर शरद पवार साहेबच दिसतील. मी ज्या दिवशी अजितदादांसोबत गेलो, त्यानंतर शरद पवार यांच्यासमोर गेलो नाही. कोणत्या तोंडाने मी साहेबांपुढे जाऊ? मी साहेबांना प्रभू रामाच्या जवळचे स्थान देतो. प्रभू रामचंद्राच नाव घेऊन मी साहेबांना फसवले. मला हा निर्णय घ्यायला भाग पडले, याच मूल्यांकन मीच करू शकतो. आता पवारसाहेबांकडे जाऊन लोटांगण घालून पाया पडणार. आमच्या सारख्या अनेकांचे अवघड झाले आहे. साहेब विचार करतीलच ना? असे विधान नरहरी झिरवाळ यांनी केला.
पुढे बोलताना नरहरी झिरवाळ मंत्रिपदावर भाष्य करताना म्हणाले, मंत्रिपद उशिरा मिळाले असे नाही. शेवटी राज्य आहे. राज्यात अनेकांच्या अपेक्षा असतात. ज्याचा हात जगन्नाथ असतो, त्यांच्या हाताला यश मिळाले. मी खरेच नशीबवान आहे. उपाध्यक्ष, अध्यक्ष पद मिळाले. उपाध्यक्ष कधी निवडून येत नाही म्हणायचे. पण मी निवडून आली आहे. माझे खाते नवीन आहे, पण मी जुना आहे. मला सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App