Naresh Mhaske : उद्धव ठाकरेंनी आधी त्यांच्या खासदारांना मराठी शिकवावे; प्रियंका चतुर्वेदी दोन ओळीही बोलू शकत नाहीत; शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

Naresh Mhaske,

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Naresh Mhaske शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाषण केले आणि त्यांच्या बोलण्यात पराभवाची छाया स्पष्ट दिसत होती. राज ठाकरे यांनी आमच्याबद्दल काहीही म्हटले नाही, म्हणून आम्हीही त्यांच्यावर काही बोलणार नाही, असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले.Naresh Mhaske

उद्धव ठाकरे यांनी अतिशय खालच्या पातळीवर भाषण केल्याचा आरोप करत, त्यांनी उसने अवसान आणल्याचे म्हस्के ( Naresh Mhaske ) म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी या दोन ओळी मराठीतही बोलू शकत नाहीत, मग उद्धव ठाकरे मराठीबाबत बोलण्याचा अधिकार कसा ठेवतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “आधी आपल्या खासदाराला मराठी शिकवा, मग मराठीचा पुळका आणा,” अशा शब्दांत म्हस्के यांनी टीकास्त्र सोडले.



पुढे बोलताना नरेश म्हस्के म्हणाले, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचे वाटोळे केले आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत नेऊन काय वाटोळे केले हे सर्वांना माहीत आहे. आता त्यांना कॉंग्रेससोबत राहायचे आहे का? आणि कॉंग्रेसला यांच्यासोबत राहायचे आहे का? असा सवाल म्हस्के यांनी केला आहे.

मी दोन महिन्यांपूर्वी आधीच सांगितले होते की शिल्लक सेनेत कोणीही राहणार नाही. परवा झालेल्या मेळाव्यात किती आमदार, खासदार होते याचे उत्तर त्यांनी द्यावे. शिवसेनेत एक आदेश असतो तरी सुद्धा कोणी उपस्थित नव्हते. उद्धव ठाकरे हे हारलेले माणूस आहेत, उद्या रस्त्यावर जरी ते शिव्या देत फिरले तरी आश्चर्य वाटायला नको, असे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.

निशिकांत दुबे यांचा निषेध

नरेश म्हस्के म्हणाले, एकनाथ शिंदे काय आहे, त्यांची ताकद काय, त्यांच्या मागचा जनाधार त्यांनी दाखवून दिला आहे. मोठा जनाधार मिळाला आहे. निशिकांत दुबे संदर्भातील वक्तव्य मी ऐकलेलं नाही पण जर ते अशा पद्धतीच वक्तव्य करत असतील तर याचा मी निषेध करतो असे म्हस्के म्हणाले. निशिकांत दुबे यांनी हे आधी स्पष्ट करावे की त्यांना बिहार सोडून झारखंडला का जावे लागले. बिहारचे असून देखील झारखंडला का जावे लागले हे आधी सिद्ध करावे त्यानंतर मराठी माणसाबद्दल बोलावे असे म्हस्के म्हणाले.

Naresh Mhaske Slams Uddhav Thackeray, Priyanka Chaturvedi Over Marathi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात