मराठा आरक्षणासाठी अवघ्या राज्यभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. कोल्हापूरनंतर सोलापुरात मराठा आरक्षणासाठी येत्या 4 जुलै रोजी उग्र मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. एवढेच नव्हे, तर राज्यातील हा सर्वात मोठा मोर्चा असल्याचं त्यांनी सांगितलं. या दिवशी सोलापूरच्या प्रत्येक तालुक्यात रास्ता रोको करण्यात येणार आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही हा मोर्चा काढणारच, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. Narendra Patil Announces Maratha Reservation rally on 4th july in solapur
विशेष प्रतिनिधी
सोलापूर : मराठा आरक्षणासाठी अवघ्या राज्यभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. कोल्हापूरनंतर सोलापुरात मराठा आरक्षणासाठी येत्या 4 जुलै रोजी उग्र मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. एवढेच नव्हे, तर राज्यातील हा सर्वात मोठा मोर्चा असल्याचं त्यांनी सांगितलं. या दिवशी सोलापूरच्या प्रत्येक तालुक्यात रास्ता रोको करण्यात येणार आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही हा मोर्चा काढणारच, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेत नरेंद्र पाटील म्हणाले की, कोल्हापूरनंतर आता सोलापुरात हा मोर्चा निघणार आहे. केवळ मराठा समाजच नाही तर शेतकरीही या मोर्चात सहभागी होणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होईल. लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं पाटील यांनी सांगितलं. मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांना भेटून पत्रं देण्यात येणार आहे. यासाठी पूर्वतयारी म्हणून या आठवड्यात जिल्ह्याचा दौरा सुरू करण्यात येणार आहे.
मोर्चात सहभागी होण्यासाठी सोलापुरातील लोकप्रतिनिधींसह खासदार संभाजी छत्रपती, खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे. मूक मोर्चा काढून काहीही होत नाही. त्यामुळे उग्र मोर्चा काढणार आहोत, असेही पाटील यावेळी म्हणाले.
Narendra Patil Announces Maratha Reservation rally on 4th july in solapur
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App