विशेष प्रतिनिधी
तीनच दिवसांपूर्वी तिकडे लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी गरजले, देश देख रहा है एक अकेला नरेंद्र कितनों को भारी पड रहा है!! विरोधीयों को नारे देने के लिए कम पड रहे है!! वह बचने के लिए रास्ते ढूंढ रहे है!! लेकिन मै देश के लिए जीता हूं!! देश का काम करने के लिए चल पडा हूं!!Narendra modi and devendra Fadanavis will destroy nehru Gandhi and Pawar Dynasty politics certainly
नरेंद्र मोदींनी हे विरोधकांच्या वर्मावरचे बोट ठेवले होते. पण हे पहिल्यांदा घडलेले नाही. केंद्रीय तपास संस्थांच्या अधिकाऱ्यांच्या नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात भरलेल्या संमेलनात याच पद्धतीचे सुतोवाच पंतप्रधान मोदी केलेच होते. त्याचा व्हिडिओ त्यावेळी आणि नंतर देखील व्हायरल झाला होता. मोदी म्हणाले होते, आपल्या अधिकाऱ्यांना अपराधबोधात राहायचे काहीच कारण नाही. जर आपण सरळ मार्गाने चाललो आहोत, तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. ज्यांचे व्हेस्टेड इंटरेस्ट आहेत ते ओरडतील. मोठी षडयंत्रे रचतील. पण मी माझ्या अनुभवातून सांगतो, गेल्या 22 वर्षात मी या कसोटीतून तावून सुलाखून बाहेर पडलो आहे. आपणही आपले काम करत राहा, असा परखड सल्ला पंतप्रधान मोदींनी या केंद्रीय तपास संस्थांच्या अधिकाऱ्यांना दिला होता.
लोकसभेतले परवाचे त्यांचे भाषण हे आधीच्या भाषणाचे एक्सटेंशनच होते. केंद्रीय तपास संस्थांवर जेवढे राजकीय विरोधक आणि लिबरल्स चिडले आहेत, त्यातूनच मोदींनी त्यांच्या वर्मावर बोट ठेवणारी ही दोन भाषणे केली आहेत. त्यामुळे विरोधक आणखीन सैरभैर झालेत. संतापलेत. कोणत्याही मार्गाने जा, कितीही आंतरराष्ट्रीय – राष्ट्रीय – प्रादेशिक पातळीवर प्रयत्न करा, जंग जंग पछाडा, मोदी नावाचा माणूस बधतच नाही. काम थांबवतच नाही आणि कोणत्याही बाबतीत आपले ऐकतच नाही, याचे विरोधकांना राजकीय आणि वैचारिक विरोधकांना अक्षरशः फ्रस्टेशन आले आहे. त्यामुळे त्यांच्या सगळ्या राजकीय कृती किंबहुना राजकीय कारवाया “मिस्डफायर” होत आहेत. संसदेत आणि संसदेबाहेर त्यांची स्ट्रॅटेजी चालतच नाही. फ्रस्ट्रेशनमुळे जणू विरोधकांचा मेंदू नीट कामच करेनासा झाला आहे. त्यामुळे दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि सरकारच्या कोणी बांधला नेमकेपणाने घेरण्यात विरोधक कमी पडत आहेत.
कोणतीही स्ट्रॅटेजी ठरवायची असेल अगदी षडयंत्र जरी असायचे असेल तरी थंड डोक्याने काम करावे लागते. तीन – चार बाजूंनी साधक – बाधक विचार करावा लागतो. यातले “थंड डोके” हे शब्द महत्त्वाचे आहेत आणि हे थंड डोकेच विरोधकांनी गमावले आहे. एकदा थंड डोके गमावले की बाकी सगळ्या राजकीय कारवाया “गरम” होतात आणि नंतर त्या विझून जातात, अशी विरोधकांची केंद्रीय पातळीवर स्थिती आहे.
जे केंद्रात, तेच राज्यात!!
ज्या देवेंद्र फडणवीस यांना सुप्रिया सुळे यांनी अकेला देवेंद्र क्या करेगा??, असा खोचक सवाल केला होता, त्या अकेला देवेंद्रनेच आता पवार नावाच्या राजकीय प्रतिष्ठेची झुल उतरवण्यासाठी हात घातला आहे. अकेल्या देवेंद्रने अडीच वर्षांचे सरकार पाडून नवीन सरकार आणून दाखवले. महाराष्ट्रातल्या पवार नावाच्या राजकीय जाळ्याचे धागे उसवून टाकले. पहाटेच्या शपथविधीचे धागे उलगडून सांगून पवारांनी गेली 50 वर्षे पांघरलेली राजकीय झूल उतरवून टाकली. पवारांचे सर्व राजकारण हे विश्वासघातावरच आधारित आहे हे त्यांच्या कारकिर्दीच्या अखेरीस पूर्णपणे अधोरेखित केले. इतकेच नाही तर अजित पवार पहाटेच्या शपथविधी संदर्भात काही पुढे बोलले तर मी त्यावर आणखी गौप्यस्फोट करेन, असे सांगून ही पवारांची राजकीय झूल पूर्ण उतरवण्याचाच जंग फडणवीसांनी बांधला आहे. हेच नेमके अकेला देवेंद्रने पवारांच्या वर्मावर ठेवलेले बोट आहे!!
पवारांच्या राजकीय कारकीर्दीच्या आधी मध्ये कुठेतरी हे बोट ठेवले गेले असते तर वेगळे. गमावली राजकीय प्रतिष्ठा पुन्हा मिळवता आली असती पण पवारांच्या कारकिर्दीच्या अगदी अखेरीला असे वर्मावर बोट ठेवले गेल्याने संपूर्ण कारकीर्दच आता विश्वासघाताची ठरून संपणार याचे पवारांना हादरे बसले आहेत. त्यामुळे पवार प्रचंड अस्वस्थ आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात आत्तापर्यंत भल्याभल्या गड्यांना लोळणारे तेल लावलेले पैलवान पवार हे “अकेला देवेंद्र” या पैलवानासमोर पूर्ण गारद होण्याच्या स्थितीत आले आहेत. इथून पुढे त्यांनी केलेली कुठलीही राजकीय कृती अथवा कारवाई तितक्याच ताकदीने किंवा त्याही पेक्षा सव्याज फेडली जाण्याची भीती त्यांना वाटते आहे. ही महाराष्ट्रातली आजची राजकीय वस्तुस्थिती आहे.
केंद्रात एक अकेल्या नरेंद्रजी भीती आणि महाराष्ट्रात अकेल्या देवेंद्रची भीती या दुहेरी कात्रीत विरोधक सापडले आहेत. पण नरेंद्र आणि देवेंद्र यांच्या राजकीय कर्तृत्वापेक्षा स्वतःच्या राजकीय फ्रस्ट्रेशन मधून आणि आधी केलेल्या बापामुळे विरोधकांनी स्वतःवर ही स्थिती ओढवून आणली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App