प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसने मोदी सरकार विरुद्ध मांडलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा सुरू असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा लोकसभेत आज रुद्रावतार बघायला मिळाला. ठाकरे गटावर निशाणा साधताना नारायण राणेंनी त्यांची औकात काढण्याचा इशारा दिला. Narayan Rane’s row in the Lok Sabha over the no-confidence motion
अविश्वास ठरावावरील चर्चेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्र सरकार असंवैधानिक असल्याचा आरोप त्यांनी केला. मणिपूरवर विषयावर सरकार गप्प का??, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी हिंदुत्वासह अनेक मुद्दे मांडले.
त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत यांच्यात खडाजंगी झाली. राणे म्हणाले की, मी अविश्वास प्रस्तावावर अनेक सदस्यांची भाषणे ऐकली आहेत. परंतु, आता अरविंद सावंत यांचे भाषण ऐकल्यावर वाटले की, मी संसदेत नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत बसलो आहे. जे उद्धव गटातील लोक या ठिकाणी हिंदुत्वाची गोष्ट करत आहेत. त्यांना मूळात अधिकार नाही. एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार चालविण्यासाठी शिवसेनेतून बाहेर पडले.
ठाकरे गटात आता उरले कोण
आता जे उद्धव ठाकरे गटात उरले आहेत. त्यांना हिंदुत्वावार बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, असे विधान करताच खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जीभ घसरली. ते म्हणाले की, तु खाली बस रे, तुझी औकात नाही. आम्हाला हिंदुत्व शिकवणारा तो शिवसेनेत कधी आला. मी 1966 सालातील शिवसैनिक आहे. त्यावेळी पीठासीन अधिकाऱ्यांनी राणे यांना वैयक्तिक टिप्पणी करू नये, अशी सूचना केली. त्यानंतर देखील दोघांमध्ये हमरीतुमरी झाली.
तुमची औकात काढेन
नारायण राणे म्हणाले की, मोदी, शहांवर प्रश्न उपस्थित करसाल तर याद रखा, त्यांच्याकडे बोट दाखवाल तर सहन करणार नाही. मी तुमची औकात काढेन, असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांना दिला.
2019 ला भाजपशी गद्दारी केली
नारायण राणे म्हणाले की, 2019 मध्ये भाजप शिवसेनेच्या युती सरकार स्थापन झाले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन करण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा सोडून शरद पवारांबरोबर सत्ता स्थापन केली तेव्हा त्यांना हिंदुत्व दिसले नाही. पण एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन सरकार स्थापन केले.
अरविंद सावंतांचे आरोप
अविश्वास प्रस्तावावर बोलण्यासाठी खासदार अरविंद सावंद उभे राहिले. त्यांनी सुरुवातीलाच केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. ईडीचे केसेस टाकून लोकांना भीती घालण्याचे काम हे सरकार करत आहे. खोटे लोक खरे करण्याचे काम चालू आहे. आम्ही हिंदुत्व अजिबात सोडले नाही. परंतू आमच्या सहकाऱ्यांवर आरोप केले जात आहेत. केंद्र सरकार म्हणजे एक प्रकारचे वॉशिंग मशीन झाले आहे. 70000 कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या भाजपनेच भ्रष्टाचार करणाऱ्यांना सरकारमध्ये घेतल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी केला.
मणिपूर प्रश्नावर सरकार असंवेदशील
अरविंद सावंत म्हणाले की, हे सरकार कुठे आहे. मणिपूर मध्ये काय घडत आहे. त्यावर बोलणार कधी. सरकारची चुप्पीच याला कारणीभूत ठरत आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातमध्ये नेले गेले. संवेदनाशील सरकार चालविली जात आहे. पब्लिक सेक्टर विकले जात आहेत. आज नऊ वर्षे झाले तरी विकास होत नाही. उद्धव ठाकरे यांच्या कोविड कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. जे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन, नीती आयोग यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App