विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुलगा नितेश राणे यांना मंत्रिपद मिळाल्याने माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे खुश आहेत. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, नितेश राणे मंत्री झाले त्याचा मला फार आनंद आहे. दोन मुलं आमदार त्यापैकी एक मंत्री, आणि बाप खासदार देशात असं समीकरण कुठेच नाही, त्यामुळे मी फार खुश आणि समाधानी आहे.
नारायण राणे यांनी राहुल गांधी यांच्या परभणी दोऱ्यावरही टीका केली. राहुल गांधी हे जेव्हा सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेण्यासाठी आले तेव्हा ते वाहनांच्या मोठ्या ताफ्यासह परभणीत दाखल झाले होते. त्यांनी अंगामध्ये निळा शर्ट घातला होता. यावरून राणे यांनी राहुल गांधी यांना जोरदार टोला लगावला आहे. ते म्हणाले.
Chhagan Bhujbal अजितदादांनी भूमिका मांडल्यानंतरही भुजबळांनी पुन्हा काढले अजितदादांच्या राजकीय नियोजनाचे वाभाडे!!
राहुल गांधींना महाराष्ट्र कळालेला नाहीये, राहुल गांधी यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरी कळलेत का? कपड्याचा रंग निळा असला म्हणजे तो आंबेडकरवादी होत नाही. कपड्यांच्या आत त्यासाठी काहीतरी लागतं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App