प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा रत्नागिरीत सुरू झाल्यानंतर नारायण राणे विरुद्ध शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पहिल्या टप्प्यापेक्षा अधिकच वाढल्या आहेत. वहिनीवरचा ॲसिड हल्ला ते चुलत भावाचा खून अशा विषयांवर एकमेकांविरुद्ध जोरदार हल्ले प्रतिहल्ले चढविले जात आहेत. Narayan Rane and Shiv sena targets each other once again
रत्नागिरीत भाषण करताना नारायण राणे यांनी कोणी कोणाच्या बहिणीवर ॲसिड हल्ला केला ते प्रकरण मी बाहेर काढणार आहे. दिशा सालियन खून प्रकरण बाहेर काढणार आहे. तो मंत्री असला तरी मी कोणालाही सोडणार नाही, असा इशारा दिला होता.
या भाषणावर शिवसेनेकडून तिखट प्रतिक्रिया आली असून रत्नागिरीचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर प्रतिहल्ला चढवला आहे. चुलत भाऊ अंकुश राणे यांचा खून कोणी केला? त्याला कोणत्या गाडीत कोणी घातले? आणि कोणी जाळले? याची पोलखोल देखील आम्ही करू, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांचा कच्चा चिट्ठा विधानसभेत वाचून दाखविला आहे. आता मी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारला नारायण राणेंची फाईल खोलायला सांगणार आहे, असे विनायक राऊत म्हणाले.
नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत पहिल्या टप्प्यात फक्त “कानाखाली वाजवू”, म्हणाल्याने मोठे राजकीय महाभारत महाराष्ट्रात रंगले. आता महाभारत युद्धाचे पडघम वाजू लागलेत की काय असे दुसऱ्या टप्प्यात वाटायला लागले आहे. कारण “कानाखालीचा आवाज” आता वहिनीवरचा ऍसिड हल्ला ते चुलत भावाचा खून अशा भाषेपर्यंत येऊन ठेपला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App